केपटाऊन: टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा निकाल काहीही लागला तरी, त्याचा फटका भारतीय संघाच्या 'नंबर वन'ला बसणार नाही.


आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडिया १२४ गुणांसह अव्वल स्थानावर, तर दक्षिण आफ्रिका ११८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

दक्षिण आफ्रिकेनं या मालिकेत ३-० असा निर्विवाद विजय मिळवला, तर उभय संघ प्रत्येकी ११८ गुणांसह संयुक्तरित्या अव्वल स्थानावर राहतील. पण त्यात भारतीय संघाची गुणकमाई काही शतांश गुणांनी अधिक असेल. त्यामुळं तांत्रिकदृष्ट्या टीम इंडियाचा आयसीसी क्रमवारीवर वरचष्मा राहिल.

दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीला 5 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ 28 डिसेंबरलाच आफ्रिकेला रवाना झाला आहे.

जाडेजाला दुखापत, धवन फिट

टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जाडेजा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळणार की नाही याबाबत शंका आहे. कारण, तो तापाने फणफणला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे सलामीवीर फलंदाज शिखर धवन दुखापतीतून सावरला असून तो पहिल्या कसोटीत खेळणार आहे.

बीसीसीआयने एक पत्रक जारी करुन याबाबत माहिती दिली आहे. जाडेजा गेल्या काही दिवसांपासून तापाने ग्रस्त आहे. बीसीसीआयची मेडिकल टीम आणि केपटाऊनमधील स्थानिक मेडिकल टीम त्याची देखरेख करत असल्याचं बीसीसीआयने म्हटलं आहे.

भारत वि दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं वेळापत्रक

कसोटी मालिका

  • पहिली कसोटी: 5 ते 9 जानेवारी 2018 – केपटाऊन

  • दुसरी कसोटी : 13 ते 17 जानेवारी 2018 – सेंच्युरिअन

  • तिसरी कसोटी: 24 ते 28 जानेवारी 2018 - जोहान्सबर्ग


वन डे मालिका

  • 1 फेब्रुवारी – पहिला वन डे सामना

  • 4 फेब्रुवारी – दुसरा वन डे सामना

  • 7 फेब्रुवारी – तिसरा वन डे सामना

  • 10 फेब्रुवारी – चौथा वन डे सामना

  • 13 फेब्रुवारी – पाचवा वन डे सामना

  • 16 फेब्रुवारी – सहावा वन डे सामना


टी ट्वेण्टी मालिका

  • 18 फेब्रुवारी – पहिला टी 20 सामना

  • 21 फेब्रुवारी – दुसरा टी 20 सामना

  • 24 फेब्रुवारी – तिसरा टी 20 सामना


 दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ

विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, के एल राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, रिद्धीमान साहा (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, पार्थिव पटेल, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमरा

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा वन डे संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर

संबंधित बातम्या

जाडेजा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीला मुकणार?

भारतीय संघ आफ्रिकेला रवाना, विराटच्या साथीला अनुष्का

क्रिकेट माझ्या रक्तात, लग्नानंतर पहिल्या मॅचबाबत विराटचं उत्तर

 भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी द. आफ्रिकेला मोठा धक्का