सेन्च्युरियन : डिन एल्गर आणि एबी डिव्हिलियर्सनं तिसऱ्या विकेटसाठी रचलेल्या ८७ धावांच्या अभेद्य भागिदारीनं, सेन्च्युरियन कसोटीचं पारडं किंचित दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं झुकलं आहे. या कसोटीत तिसऱ्या दिवशी खेळ थांबला, त्या वेळी दक्षिण आफ्रिकेनं दोन बाद ९० धावांची मजल मारली होती. पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळं चहापानानंतरच्या सत्रात केवळ दहा षटकांचा खेळ होऊ शकला.


पहिल्या डावातली २८ धावांची आघाडी जमेस धरता, दक्षिण आफ्रिकेची एकूण आघाडी ११८ धावांची झाली आहे. त्यामुळे टीम इंडिया या सामन्यात बॅकफूटवर गेली आहे.

विराट कोहलीनं झळकावलेल्या मॅरेथॉन शतकानं टीम इंडियाला सर्व बाद ३०७ धावांची मजल मारुन दिली. विराटचं कसोटी कारकीर्दीतलं हे एकविसावं शतक ठरलं. त्यानं २१७ चेंडूंमधली १५२ धावांची खेळी १५ चौकारांनी सजवली.

विराटनं हार्दिक पंड्याच्या साथीनं सहाव्या विकेटसाठी ४५ धावांची आणि रवीचंद्रन अश्विनच्या साथीनं सातव्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी रचली.

या कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या 335 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची दोन बाद 28अशी बिकट अवस्था झाली होती. त्या परिस्थितीत फलंदाजीला उतरलेल्या विराटनं आदर्श खेळी करुन भारतीय डावाला आकार दिला. त्यानं हे शतक पंधरा चौकारांनी सजवलं. मात्र, विराट वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

संबंधित बातम्या :

विराटमुळे भारताच्या पहिल्या डावाला आकार