केपटाऊन : दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यानं केपटाऊनच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात टीम इंडियाला सात बाद १७२ असं रोखलं. त्यामुळं हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेसमोर 20 षटकांत १७३ धावांचंच आव्हान आहे.
या सामन्यात शिखर धवन आणि सुरेश रैनानं दुसऱ्या विकेटसाठी रचलेली ६५ धावांची भागीदारी हेच भारताच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं. त्यानंतर भारतीय फलंदाजांना धावगती उंचावण्यात यश आलं नाही.
धवननं ४० चेंडूंत तीन चौकारांसह ४७ धावांची खेळी उभारली. त्यानं रैनाच्या साथीनं ६५ धावांची आणि पांडेच्या साथीनं ३२ धावांची भागीदारी रचली. रैनानं २७ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह ४३ धावांची खेळी उभारली.
भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघादरम्यान दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत सहा टी-20 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यातल्या चार सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली आहे. तर दोन सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेत उभय संघात झालेल्या तीन मालिकांपैकी दोन मालिका भारताने, तर एक यजमान संघाने आपल्या नावावर केली आहे. त्यामुळे केपटाऊनच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत भारतीय संघाचं पारडं जडच मानलं जात आहे.
वन डे प्रमाणेच टी-20 मालिकेतही भारतीय फलंदाजांनी आक्रमक खेळाचं प्रदर्शन केलं. त्यामुळेच पहिल्या दोन्ही सामन्यात टीम इंडियाला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. त्यामुळे हा सामना जिंकून भारत टी-20 मालिकाही खिशात टाकणारा का? याकडेच क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
निर्णायक टी-20 मध्ये टीम इंडियाचं आफ्रिकेसमोर 173 धावांचं आव्हान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Feb 2018 11:35 PM (IST)
दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यानं केपटाऊनच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात टीम इंडियाला सात बाद १७२ असं रोखलं. त्यामुळं हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेसमोर 20 षटकांत १७३ धावांचंच आव्हान आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -