India vs South Africa 1st T20 Weather Updates : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्याचा उत्साह पावसामुळे बिघडू शकतो. आज (10 डिसेंबर) दक्षिण आफ्रिकेच्या डर्बनमधील किंग्समीड स्टेडियमवर हा सामना होणार आहे, त्या वेळेत पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतीय प्रमाणवेळेनुसार आज (10 डिसेंबर) संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. ग्राउंडवर अजूनही कव्हर असून ते काढण्यात आलेले नाहीत. 






डर्बनच्या किंग्समीड स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये टी-20 सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल पण दक्षिण आफ्रिकेत तो 4 वाजता असेल. डर्बनमधील हवामान अंदाजानुसार, संध्याकाळपासून रात्रीपर्यंत दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. रात्रीही पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. याचाच अर्थ आजच्या सामन्यातील मजा खराब होऊ शकते.






सामन्यादरम्यान डर्बनमध्ये तापमान 20 अंशांच्या आसपास असेल. येथे दवबिंदू 17 अंश आहे, म्हणजे या तापमानापेक्षा कमी झाल्यास दवबिंदू कमी होण्याची शक्यता असते. मात्र, आज तापमान इतके कमी राहण्याची शक्यता नाही. हवेत भरपूर आर्द्रता असणार आहे.


टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या हाती 


टीम इंडिया येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा मालिकेत दिसणार नाही. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादव टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे आणि केएल राहुल वनडे मालिकेचे नेतृत्व करताना दिसणार आहे.




रोहित शर्मा कसोटी मालिकेतून मैदानात परतणार आहे. विराट कोहलीही येथे टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळत नाही. तो थेट टेस्ट जर्सीमध्येच दिसणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या