Raju Shetti : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याप्रमाणेच सांगली (Sangli) जिल्ह्यातील कारखानादारांनी दर द्यावा, या मागणीवर आम्ही ठाम असल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) म्हणाले. कोल्हापूरपेक्षा सांगली जिल्ह्याची रिकव्हरी कमी आहे हा सांगली जिल्ह्यातील कारखानादारांनी लावलेला जावईशोध असून, हे चुकीचे असल्याचे शेट्टी म्हणाले. आमदार जयंत पाटील (Jayant Patil) आणि आमदार विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) या दोघांच्या नियंत्रणात 11 साखर कारखाने आहेत. या दोन आमदाराच्या हटवादी भूमिकेमुळं सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा सुटत नसल्याची टीका राजू शेट्टींनी केली. 


आंदोलन आणखी तीव्र करण्याचा राजू शेट्टींचा इशारा


सांगलीचे जिल्हाधिकारी कारखानादाराची बाजू घेत आहेत. यापुढे आम्ही आंदोलन आणखी तीव्र करु असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. ऊस दराच्या मुद्यावरुन राज्यातील वातावरण चांगलच गरम झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणेच सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी देखील ऊसाला दर द्यावी अशी भूमिका राजू शेट्टींनी मांडली आहे. ऊस दरासाठी राजू शेट्टींनी वसंतदादा साखर कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. त्यावेळी ते बोत होते. 


जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्यामुळे शेतकऱ्यांना दर मिळत नाही


सांगलीमध्ये ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्यासमोर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. कारखान्यांमध्ये घुसण्याचा देखील स्वामिनीच्या कार्यकर्त्यांकडून प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले. त्यामुळं आता कारखान्याच्या गेटसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. स्वतः राजू शेट्टी या ठिकाणी कारखान्याच्या गेटसमोर ठाण मांडून बसले आहेत. जोपर्यंत ऊस दराचा निर्णय जाहीर होत नाही, तोपर्यंत कारखान्यासमोरुन उठणार नाही, अशी भूमिका राजू शेट्टींनी घेतली आहे. तसेच जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्यामुळे शेतकऱ्यांना दर मिळत नाही, असा आरोप शेट्टींनी केला आहे. त्यामुळे आंदोलन आणखी चिखळणार,अशी स्थिती निर्माण झाली असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.


मागील वर्षी तुटलेल्या उसाचे 400 रुपये आणि चालू हंगामात ऊसाला 3500 रुपये दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रात तीव्र आंदोलन सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दराचा तिढा सुटला आहे. मात्र, अद्याप सांगली जिल्ह्यातील दराचा प्रश्न कायम आहे. त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कोल्हापूर प्रमाणेच ऊसाला दर द्यावा अशी भूमिका राजू शेट्टींनी घेतली आहे. तसेच माजी मंत्री जयंत पाटील आणि विश्वजीत कदम यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Raju Shetti : हवामानाचे अचूक अंदाज नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, मात्र याकडं सरकारचं दुर्लक्ष : राजू शेट्टी