लंडन : वर्ल्ड हॉकी लीगमधील सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु असून, यात टीम इंडियाने पाकिस्तानवर 7-1ने धुव्वा उडवला आहे. भारताकडून हरमनप्रीतने दोन तर तलविंदर सिंह ने दोन गोल केले.


LIVE UPDATAE

  • आकाशदीपने 58 व्या सेकंदाला सातवा गेल केला.

  • तर उमर भुट्टाने पाकिस्तानसाठी पहिला गोल केला.

  • प्रदीपने सहावा गोल केला.

  • आकाशदीपने पाचवा गोल केला.


 

भारतीय हॉकी संघाने वर्ल्ड हॉकी लीगच्या सेमीफायनलमध्ये सलग दोनवेळा विजय मिळवला आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात भारताने कॅनडाला 3-0 ने हरवलं होतं. त्यापूर्वी स्कॉटलंडला 4-1ने मात दिली होती.

हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान पूल-बीमधून खेळत आहेत. भारतीय हॉकी संघ सध्या जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी आहे. तर पाकिस्तानचा हॉकी संघ 13 व्या स्थानी आहे.

दुसरीकडे पाकिस्तानला नेदरलँडने 4-0ने हारवलं होतं. पण दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने कॅनाडाला 6-0 ने हरवले होते.