कानपूर: टीम इंडियाने कानपूर वन डेत न्यूझीलंडला धूळ चारुन, तिसऱ्या वन डेसह तीन सामन्यांची मालिका 2-1 ने खिशात घातली. भारताने कालच्या सामन्यात न्यूझीलंडचा 6 धावांनी पराभव केला.


भारताने न्यूझीलंडला विजयासाठी 338 धावांचं आव्हान दिलं होतं. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी त्या लक्ष्याचा आत्मविश्वासाने पाठलाग केला. पण जसप्रीत बुमरा आणि यजुवेंद्र चहलच्या प्रभावी माऱ्याने न्यूझीलंडला 50 षटकांत सात बाद 331 धावांत रोखलं.

दरम्यान, भारत-न्यूझीलंड यांच्यातील तीनही सामन्यात एक साम्य आहे. ते साम्य म्हणजे 6 हा अंक होय.

हा अंक तीनही सामन्याच्या शेवटी योगायोगाने पाहायला मिळाला.

पहिला सामना

मुंबईतील वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात, न्यूझीलंडने भारताचा 6 विकेट्स राखून पराभव केला होता.

दुसरा सामना

यानंतर मग दुसरा सामना पुण्यातील गहुंजे मैदानावर झाला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 6 विकेट्स राखून पराभव केला.

तिसरा सामना

तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली असताना, तिसरा अंतिम सामना कानपूरमध्ये खेळवण्यात आला.

या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करुन न्यूझीलंडला विजयासाठी 338 धावांचं आव्हान दिलं होतं. पण न्यूझीलंडला हे आव्हान पार करता आलं नाही. त्यांना 7 बाद 331 धावांपर्यंतच मजल मारता आली.  भारताने हा सामना 6 धावांनी जिंकला.

त्यामुळेच या मालिकेतील तीनही सामन्यांच्या निकालात 6 हा अंक लक्ष वेधून घेणारा ठरला.

संबंधित बातम्या

... म्हणून विराट गोलंदाजांशी न बोलता बाँड्री लाईनवर थांबला होता

सर्वाधिक वेगवान 9 हजार धावा पूर्ण, विराटचा विश्वविक्रम

विराटला भेटण्यासाठी सुरक्षा भेदून चाहता मैदानात!