इंदूर: ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर भारताने इंदूर कसोटीत न्यूझीलंडला पहिल्या डावात 299 धावांवरच रोखलं. त्यामुळं भारताला पहिल्या डावात 258 धावांची आघाडी मिळाली.अश्विननं सहा विकेट्स काढल्या तर रविंद्र जाडेजानं 2 फलंदाजांना माघारी धाडलं.
त्यानंतर टीम इंडियानं फॉलो ऑन न देता परत फलंदाजीसाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. भारताने तिसऱ्या दिवसअखेर बिनबाद 18 धावांची मजल मारली असून टीम इंडियाची न्यूझीलंडवरील आघाडी 276 धावांची झाली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा मुरली विजय 11 धावांवर तर चेतेश्वर पुजारा एक धावेवर खेळत होता. गौतम गंभीरला खांद्याच्या दुखापतीमुळं 6 धावांवर रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं.
----------------
इंदूर: इंदूर कसोटीत आर अश्विनच्या प्रभावी माऱ्यासमोर न्यूझीलंडची चांगलीच घसरगुंडी उडाली आहे. एक बाद 118 धावांवरुन न्यूझीलंडची पाच बाद 148 अशी केविलवाणी अवस्था झाली.
उपाहारानंतर अश्विननं प्रभावी मारा करुन न्यूझीलंडचं अक्षरश: कंबरडं मोडलं. अश्विननं चार विकेट्स काढून गप्टिलला धावचीत करण्यातही मोलाचा वाटा उचलला.
न्यूझीलंडनं आतापर्यंत पाच बाद 154 धावांची मजल मारली असून बीजे वॉटलिंग दोन आणि जेम्स नीशाम 4 धावांवर खेळत आहे. त्याआधी गप्टिल आणि टॉम लॅथमनं 118 धावांची सलामी दिली. टॉम लॅथमनं 53, तर गप्टिल 72 धावांची खेळी केली.
दरम्यान, भारताने पहिला डाव 5 बाद 557 धावांवर घोषित केला. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 365 धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे भारताला ही मजल मारता आली.
संबंधित बातम्या
न्यूझीलंडच्या कोचकडून विराटच्या द्विशतकीय खेळीचं कौतुक