विशाखापट्टणम : टीम इंडियानं पहिल्या डावात घेतलेल्या 200 धावांच्या आघाडीमुळे इंग्लंडसमोर विजयासाठी 405 धावांचं कठीण आव्हान उभं राहिलं आहे. जयंत यादव आणि मोहम्मद शमीनं अखेरच्या विकेटसाठी केलेल्या 38 धावांच्या धडाकेबाज भागिदारीनं विशाखापट्टणम कसोटीत भारताला दुसऱ्या डावात 204 धावांची मजल मारुन दिली.
विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी आदल्या दिवशीच्या 3 बाद 98 धावांवरुन रविवारी भारताचा दुसरा डाव पुढे सुरु केला.
टीम इंडियानं पहिल्या डावात घेतलेल्या 200 धावांच्या आघाडीमुळे इंग्लंडसमोर विजयासाठी 405 धावांचं कठीण आव्हान उभं राहिलं आहे.
इंग्लंडच्या प्रभावी आक्रमणासमोर भारताचा दुसरा डाव नऊ बाद 166 असा कोसळला होता. त्या परिस्थितीत जयंत आणि शमीनं केलेल्या मागिदारीनं भारताला सावरलं.
या कसोटीचा आजचा चौथा दिवस असून, धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंडच्या हाताशी पाच सत्रांचा अवधी आहे.भारताने तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात तीन बाद 98 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडवर एकूण 298 धावांची आघाडी झाली होती. या कसोटीत भारतानं पहिल्या डावात 200 धावांची आघाडी घेतली होती.