मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्रिशतकवीर करुण नायरने भारतीय संघात कमबॅक केलं आहे. तर दिल्लीचा तरुण विकेटकिपर फलंदाज ऋषभ पतंला पहिल्यांदाच भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आलं आहे.
वन डे आणि टी ट्वेण्टी संघात दमदार कामगिरी करणाऱ्या चायनामन कुलदीप यादव आणि मध्यमगती गोलंदाज मोहम्मद शमीचीही भारतीय संघात निवड झाली आहे. मात्र इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात दुखापत झालेल्या भुवनेश्वर कुमारचं नाव अंतिम यादीत सध्यातरी नाही. भुवनेश्वरच्या समावेशाबाबत ऐनवेळी निर्णय घेऊ, असं टीम व्यवस्थापनाने म्हटलं आहे.
पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला 1 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे.
भारतीय संघ
इंग्लंडविरुद्धच्या 3 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ : विराट कोहली, शिखर धवन, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीस बुमरा, शार्दूल ठाकूर
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिली कसोटी - 1 ऑगस्ट, बर्मिंगहॅम
दुसरी कसोटी - 9 ऑगस्ट- लॉर्ड्स, लंडन
तिसरी कसोटी- 18 ऑगस्ट- ट्रेन्ट ब्रिज
चौथी कसोटी- 30 ऑगस्ट- द रोज बोऊल, साऊथेम्पटन
पाचवी कसोटी- 7 सप्टेंबर- केनिंग्टन ओवल (द ओवल), लंडन
इंग्लंडविरुद्ध कसोटीसाठी, ऋषभ पंतला संधी, करुण नायरचं कमबॅक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jul 2018 02:56 PM (IST)
त्रिशतकवीर करुण नायरने भारतीय संघात कमबॅक केलं आहे. तर दिल्लीचा तरुण विकेटकिपर फलंदाज ऋषभ पतंला पहिल्यांदाच भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -