IND vs ENG 5th T20 Live Score | पाहा भारत विरुद्ध इंग्लंडमधील निर्णायक टी20 सामन्याचे लाईव्ह अपडेट्स
India vs England 5th T20 Live Score भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या पाच टी20 मालिकेतील पाचवा सामना शनिवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे पार पडत आहे.
3-2 अशा फरकानं भारतीय क्रिकेट संघानं टी20 मालिका खिशात टाकली. 36 धावांनी भारतीय संघानं जिंकला सामना. 188 धावांवर इंग्लंडला गुंडाळलं
शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीमुळं इंग्लंडचा आणखी एक खेळाडू माघारी. पाहुण्या संघाची धावसंख्या 8 गडी बाद 178 धावा
एकामागोमाग एक इंग्लंडचे फलंदाज माघारी. आर्चर खातं न खोलताच स्टंपिग आऊट
इंग्लंडला सहावा धक्का. सहा गडी बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या हातातून सामना जवळपास निसटल्याचं चित्र. भारतीय संघाचं दमदार पुनरागमन
पांड्याच्या चेंडूवर मॉर्गन झेलबाद. निसटता खेळ पुन्हा भारताच्या बाजुनं
शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर मलान त्रिफळाचीत. इंग्लंडच्या धावसंख्येचा वेग मंदावला
इंग्लंडचा आणखी एक खेळाडू बाद. संघाच्या धावसंख्येत मोलाचं योगदान देऊन बटलर माघारी. इंग्लंडची धावसंख्या 2 गडी बाग 132 धावा.
मलान आणि बटलर यांच्यामध्ये 100 धावांची भागिदारी पूर्ण झाली आहे. 10 षटकांनंतर इंग्लंडची धावसंख्या 1 गडी बाद 104 धावा
प्रत्येक षटकात दमदार फलंदाजी करत भारतानं दिलेलं आव्हान गाठण्यासाठी इंग्लंडकडूनही दमदार फलंदाजी केली जात आहे. आतापर्यंत इंग्लंडनं 50 धावा पूर्ण केल्या असून, मलान आणि बटलर यांनी इंग्लंडचा डाव सावरला.
4 षटकांनंतर इंग्लंडची धावसंख्या 1 गडी बाद 41 धावा
इंग्लंडचा सलामीवीर जेसन ऱ़ॉय माघारी. पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर भुवनेश्वर कुमारने रॉयला त्रिफळाचीत केलं.
20 षटकांच्या खेळात भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी करत 2 गडी बाद 224 धावा करत पाहुण्या इंग्लंडच्या संघापुढे कमालीचं आव्हान उभं केलं. सूर्यकुमार यादव, विराट कोहली, रोहित शर्मा, आणि हार्दिक पांड्या यांनी संघाच्या धावसंख्येत मोलाचं योगदान दिलं. इंग्लंडचा संघ 225 धावांचं आव्हान गाठण्यात यशस्वी ठरतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
विराट कोहलीनं 36 चेंडूंमध्ये कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळत अर्धशतक पूर्ण केलं. सलामीवीर म्हणून खेळपट्टीवर आलेल्या विराटनं धावसंख्येत मोलाचं योगदान दिलं.
तुफान फटकेबाजी करत 17 चेंडूंमध्ये 32 धावा करत सूर्यकुमार यादव झेलबाद. त्याचा हा झेल टीपण्यासाठी इंग्डंच्या खेळाडूंच्या प्रयत्नांनाही दाद देण्यात येत आहे
खेळपट्टीवर येताच सूर्यकुमार यादव यानं फटकेबाजीला सुरुवात केली, 13 चेंडूंमध्ये 31 धावा करण्याची कमाल केली आहे. चौकार आणि षटकारांची बरसात करत सूर्यकुमारनं वेळ न दवडता भारतीय डावाची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली आहे.
रोहित शर्मा 64 धावांच्या खेळीनंतर त्रिफळाचीत. इंग्लंडच्या संघात आनंदाची लाट.
रोहित शर्माच्या दमदार अर्धशतकामुळं इंग्लंडच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ. चौकार- षटकारांची बरसात करत रोहित शर्मानं जिंकली सर्वांची मनं
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी केलेल्या भक्कम सुरुवातीमुळं इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे अडचणींचा डोंगर दिसू लागला आहे. सलामीच्या या जोडीला माघारी धाडण्यासाठी इंग्लंडकडून गोलंदाजीचा मारा सुरु आहे.
सहाव्या षटकापर्यंत भारताची धावसंख्या बिनबाद 52 धावा. विराट आणि रोहितनं भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली.
सलामीवीर म्हणून भारताच्या वतीने खेळपट्टीवर आलेल्या विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनीही संयमी आणि आक्रमक अशा दोन्ही प्रकारच्या खेळीचा समतोल राखत भारताचा डाव पुढे नेण्याचं काम सुरु ठेवले आहे.
भारतीय संघानं नाणेफेक गमावली. इंग्लंडनं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर, भारतीय संघातून के.एल. राहुलला निराशाजनक कामगिरीमुळं वगळण्यात आलं आहे. रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली ही आहे या सामन्यासाठीची भारताची सलामीची जोडी.
पार्श्वभूमी
India vs England 5th T20 Live Score भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या पाच टी20 मालिकेतील पाचवा सामना शनिवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे पार पडत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेची हा पाचवा सामना क्रीडारसिकांची उत्सुकता ताणून धरणार आहे.
सध्याच्या घडीला ही मालिका 2-2 अशा गुणसंख्येनं बरोबरीत आहे. त्यामुळं पाचवा सामना हा खऱ्या अर्थानं निर्णायक ठरणार आहे. घरच्या मैदानावर होणाऱ्या या मालिकेत यजमान भारतीय संघ बाजी मारणार की पाहुण्या इंग्लंडच्या संघाला विजयी पताका रोवण्याची संधी मिळणार हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे.
इंग्लंडच्या संघानं पहिला आणि तिसरा सामना जिंकला. तर दुसऱ्या आणि चौथ्या सामन्यात भारताला विजयाची संधी मिळाली. पण, आता अखेरच्या सामन्यात नेमका कोणता संघ विजयी होतो याकडे क्रीडा जगताचं लक्ष असेल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -