India Vs England Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना निर्णायक वळणावर आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा डाव 290 धावांवर आटोपल्यानंतर भारताना बिनबाद 43 अशी सुरुवात दुसऱ्या डावात केलीय. काल दुसऱ्या दिवशी इंग्लंडची बॅटिंग सुरु असताना जार्वोनं पुन्हा मैदानात एन्ट्री मारली. भारताच्या गोलंदाजी दरम्यान डॅनियल जार्विस उर्फ ‘जार्वो 69’ (Jarvo 69) हा पुन्हा एकदा मैदानात पळत आला. जार्वो मैदानात आला तेव्हा भारताचा गोलंदाज उमेश यादव गोलंदाजी करत होता. मैदानाबाहेरुन खेळाडूंच्या दिशेने ‘जार्वो 69’ मैदानात घुसला.
India Vs England : 'भारतीय फलंदाज' म्हणून जार्वोची मैदानात एन्ट्री अन्... व्हिडीओ व्हायरल
हातात बॉल घेऊन बॉलिंग करत त्याने जॉनी बेयरस्टोला धडक दिली. त्यानंतर त्याला सुरक्षारक्षकांनी खेचून मैदानाबाहेर काढले. जार्वोचा व्हिडीओ ट्वीटरवर ट्रेंड होत आहे. जार्वोनं याआधीच्या सामन्यांमध्ये मैदानात धडक मारली आहे.
लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर तिसऱ्या कसोटी सामन्यातही जार्वोनं मैदानात एन्ट्री केली होती. जार्वोनं 69 नंबरची भारताची जर्सी घातली होती सोबत पॅड आणि हेल्मेट देखील घातलं होतं.
जार्वोनं लीड्समध्ये भारतीय फलंदाजाच्या रुपात एन्ट्री घेतली आणि एकच खळबळ उडाली होती. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर तो मैदानात घुसला होता. पंचांनी लगेच त्याला बाहेर काढण्याचे आदेश दिले. नंतर सेक्युरिटी गार्ड्सनी त्याला उचलून मैदानाबाहेर नेले.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल झाला आहे. सोबतच जार्वोचे फोटो देखील व्हायरल होत आहेत. जार्वो क्रिझपर्यंत पोहोचला होता. दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी देखील तो मैदानात उतरला होता.
दुसऱ्या डावात भारताची सावध सुरुवात
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी ओव्हल येथे खेळवला जात आहे. कसोटी सामन्याचा दुसऱ्या दिवशी इंग्लडने भारताविरूद्धच्या पहिल्या डावात 290 धावा करत 99 धावांची आघाडी घेतली. इंग्लंडकडून ओली पोपने 159 बॉलमध्ये सहा चौकारासह 81 धावा केल्या. तर ऑलराऊंडर क्रिस वोक्सने 60 बॉलमध्ये 11 चौकरासह 50 धावा केल्या. भारतानं दुसऱ्या डावाची सावध सुरुवात केली असून दुसऱ्या दिवसाखेर बिनबाद 43 धावा केल्या आहेत.