साऊदम्पटन: सॅम करनने आधी मोईन अली आणि मग स्टुअर्ट ब्रॉडच्या साथीने रचलेल्या भागिदाऱ्यांनी साऊदम्प्टन कसोटीत इंग्लंडला पहिल्या डावात सर्व बाद 246 धावांची समाधानकारक मजल मारुन दिली.

भारताच्या वेगवान गोलंदाजांनी एका क्षणी इंग्लंडची सहा बाद 86 अशी दाणादाण उडवली होती. पण सॅम करनने मोईन अलीच्या साथीने 81 धावांची भागीदारी रचून इंग्लंडचा डाव सावरला. मग त्याने ब्रॉडच्या साथीने 63 धावांची भागीदारी करुन इंग्लंडच्या डावाला सर्व बाद 246 असा आकार दिला.

करनने आठ चौकार आणि एक षटकारासह 78 धावांची खेळी उभारली. मोईन अलीने 40, तर स्टुअर्ट ब्रॉडने 17 धावांची खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमराने तीन, तर ईशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि अश्विनने प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. हार्दिक पंड्यानं एक विकेट काढली.


भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या साऊदम्प्टन कसोटीत, इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडिया प्रथम क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरली.

भारताने या कसोटीसाठी नॉटिंगहॅमच्या तिसऱ्या कसोटीतला विजयी संघ कायम राखला. तब्बल 38 व्या सामन्यानंतर कोहलीने पहिल्यांदाच संघ कायम ठेवला आहे. यापूर्वी प्रत्येक कसोटीनंतर कोहली संघात काही ना काही बदल करत होता. पण या कसोटीच्या निमित्ताने पहिल्यादांच त्याने संघ कायम ठेवला आहे.

इंग्लंडने या कसोटीसाठी ख्रिस वोक्सऐवजी सॅम करन आणि ऑलिव्हर पोपऐवजी मोईन अलीला संधी दिली आहे.

साउदम्प्टनच्या रोज बाऊल स्टेडियमवर हा सामना आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे साउदम्प्टन कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारी या युवा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. पण या दोघांनाही अंतिम 11 जणांमध्ये संधी मिळालेली नाही.

भारत: शिखर धवन, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, आर अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

मुरली विजयला डच्चू, पृथ्वी शॉ भारतीय संघात!

इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईकर युवा फलंदाज पृथ्वी शॉचा समावेश करण्यात आला आहे. सलामीवीर फलंदाज मुरली विजयच्या जागी त्याला संधी देण्यात आली. भारतीय संघातील दुसरा बदल म्हणजे हैदराबादचा युवा फलंदाज हनुमा विहारीला संधी देण्यात आली आहे. उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी संघातील हा दुसरा मोठा बदल आहे. फिरकीपटू कुलदीप यादवला संघातून वगळण्यात आलं आहे. सुरुवातीला फक्त तीन सामन्यांसाठीच भारतीय संघ निवडण्यात आला होता.

उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ


विराट कोहली, शिखर धवन, केएल राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, हनुमा विहारी, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जाडेजा, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, शार्दुल ठाकूर


संबंधित बातम्या 



टीम इंडियाचा विजय केरळ पूरग्रस्तांना समर्पित; सामन्याचं मानधनही दिलं   


दहा मिनिटांत खेळ खल्लास, भारताचा इंग्लंडवर 203 धावांनी विजय  


रँकिंगमध्ये विराट कोहली पुन्हा नंबर वन! 


विराट कोहली सचिनचा 'हा' विक्रम मोडण्याच्या तयारीत