Ind vs Eng T20 LIVE Score | टी20 मालिकेत इंग्लंडची सरशी
दुसऱ्या सामन्यात मात्र भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत सामना खिशात टाकला. परिणामी आता, बरोबरीत असणाऱ्या या मालिकेत कोण सरशी मिळवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये खेळला गेलेला तिसरा टी20 सामना इंग्लंडनं खिशात टाकला. 8 गडी राखत इंग्लंडनं हा सामना जिंकला.
18 धावा करुन डेव्हिड मलान बाद. वॉशिंग्टन सुंदरनं धाडलं तंबूत परत
इंग्लंडच्या संघालाही सुरुवातीच्या काळातच पहिला झटका मिळाला आहे. जेसन रॉय तंबूत परत.
रॉय आणि बटलर यांनी अतिशय आत्मविश्वासाने इंग्लंडच्या फलंदाजीची सुरुवात केली.
इंग्लंडच्या संघाकडून होणाऱ्या गोलंदाजीचा मारा झेलत भारतीय संघाने अखेर 20 षटकांमध्ये 156 धावांचं आव्हान विरोधी संघापुढे ठेवलं.
कर्णधार विराट कोहली यानं भारतीय फलंदाजांची पडझड सुरू असतानाच संयमी खेळीचं प्रदर्शन करत संधाला काही अंशी समाधानकारक धावसंख्येच्या रुळावर आणलं.
15 व्या षटकात संघाची धावसंख्या 86 वर असतानाच श्रेयस अय्यरच्या रुपात भारतानं पाचवा गडी गमावला.
एका चुकीच्या निर्णयामुळं ऋषभ पंत याला धावबाद व्हावं लागलं आहे. परिणामी इंग्लंडनं भारताचे 4 गडी माघारी पाठवले आहेत.
दुसऱ्या टी20 सामन्यात अर्धशतकी खेळी खेळणाऱ्या इशान किशन याला यावेळी मात्र प्रभावी खेळ खेळण्यात अपयश आलं.
पहिल्या दोन सामन्यांतून वगळल्यानंतर रोहित शर्माला तिसऱ्या सामन्यात संधी देण्यात आली. पण, या सामन्यातही त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही. अवघ्या 15 धावा करुन रोहित शर्मा झेलबाद झाला.
भारताला पहिला झटका. राहुल पुन्हा एकदा शून्यावर बाद. क्रीडारसिकांची निराशा. तिसऱ्याच षटकात त्रिफळाचीत
रोहित शर्मा आणि के.एल. राहुल या सलामीच्या जोडीनं भारतीय फलंदाजीची सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या दोन षटकांमध्ये संघाची सुरुवात काहीशी धीम्या गतीनं झाल्याचं पाहायला मिळालं.
इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. एकंदर खेळपट्टी पाहता हा निर्णय संघासाठी फायद्याचा ठरेल अशी प्रतिक्रिया इंग्लंडच्या कर्णधाराने दिली
पार्श्वभूमी
IND Vs ENG 3rd T20 कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाकडून मात मिळाल्यानंतर टी20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेची सुरुवात इंग्लंडनं दणक्यात केली. भारतीय संघाला पराभवाचा दणका देत या संघानं टी20 सामन्यांच्या मालिकेत सरशी मिळवली. पण, त्यानंतर पार पडलेल्या दुसऱ्या सामन्यात मात्र भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत सामना खिशात टाकला. परिणामी आता, बरोबरीत असणाऱ्या या मालिकेत कोण सरशी मिळवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
सध्याच्या घडीला भारतीय संघाच्या फलंदाजीची फळी पाहता रोहित शर्माला या सामन्यात स्थान मिळावं अशी क्रीडारसिकांची मागणी आणखी तीव्र होत आहे. त्यामुळं त्याला संधी मिळाल्यास भारतीय फलंदाजीला मोठा आधार मिळेल ही बाब नाकारता येत नाही.
अर्धशतकी खेळीनंतर विराट इशानला म्हणाला, 'ओए... चारो तरफ बॅट दिखा'
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि इंग्लंड संघांमधील उर्वरित तिन्ही टी 20 सामने आता प्रेक्षकांविना खेळवण्यात येणार असल्याची माहिती गुजरात क्रिकेट असोसिएशननं दिली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गुजरात क्रिकेट असोसिएशननं हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचं संकट पाहता, एकदिवसीय मालिकाही प्रेक्षकांविनाच खेळवण्यात येणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -