लंडन : इंग्लंडने भारताचा अख्खा डाव 236 धावांत गुंडाळून, लॉर्डसवरच्या दुसऱ्या वन डेत 86 धावांनी विजय साजरा केला. इंग्लंडने या विजयासह तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
या सामन्यात इंग्लंडने भारताला विजयासाठी 323 धावांचं कठीण आव्हान दिलं होतं. पण त्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा अख्खा डाव 236 धावांत आटोपला.
लियाम प्लन्केटने 46 धावांत चार विकेट्स काढून भारताचा डाव गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली. विराट कोहली आणि सुरेश रैनाने चौथ्या विकेटसाठी रचलेली 80 धावांच्या भागीदारीचा अपवाद वगळता भारतीय डावा मोठी भागीदारी पाहायला मिळाली नाही आणि तेच भारताच्या पराभवाचं कारण ठरलं.
उभय संघांमधला तिसरा आणि निर्णायक सामना 17 जुलै रोजी लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात खेळवला जाणार आहे. मालिका विजयासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा असेल.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडने ज्यो रुटच्या शतकी खेळीच्या (113) बळावर भारतासमोर 322 धावांचं आव्हान उभं केलं. या विशाल आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात तर चांगली झाली, मात्र अर्धशतकी भागीदारी होण्यापूर्वीच 49 धावसंख्येवर रोहित शर्मा 15 धावा करुन माघारी परतला.
त्यानंतर कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला. शिखर धवन आणि कोहलीकडून अपेक्षा होती. मात्र 57 धावसंख्येवर भारताचे दोन्ही सलामीवीर फलंदाज माघारी परतले होते. त्यानंतर आलेल्या लोकेश राहुलला खातंही उघडता आलं नाही.
महत्त्वाचे फलंदाज माघारी परतत असताना सर्व मदार विराट कोहली आणि सुरेश रैनावर होती. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक सामन्यात युवराज सिंह आणि मोहम्मद कैफ यांनी केली तशी भागीदारी दोघे करतील असं वाटत असतानाच कोहली मोईन अलीच्या चेंडूवर बाद झाला.
आता भारताची मदार बेस्ट मॅच फिनिशर महेंद्रसिंह धोनीवर होती. धोनीने 33 धावा करताच वन डे क्रिकेटमधल्या 10 हजार धावा पूर्ण केल्या. मात्र त्यालाही भारताला विजय मिळवून देता आला नाही. हार्दिक पंड्याही 21 धावा करुन धोनीच्या अगोदरच माघारी परतला.
लॉर्ड्स वन डेत भारताचा 86 धावांनी पराभव
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jul 2018 11:40 PM (IST)
इंग्लंडने या विजयासह तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यात इंग्लंडने भारताला विजयासाठी 323 धावांचं कठीण आव्हान दिलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -