IND vs ENG 2nd ODI, LIVE : भारत- इंग्लंड दुसरा एकदिवसीय सामना, पाहा सामन्याचे प्रत्येक अपडेट

India vs England 2nd ODI Score LIVE Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना जिंकून भारतानं 1-0 अशी आघाडी घेतलेली आहे

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Mar 2021 01:30 PM
इंग्लंडचे 4 खेळाडू माघारी

स्टोक्स माघारी परतल्यानंतर इंग्लंडनं आणखी दोन खेळाडूही गमावले. त्यामुळं संघाची फलंदाजी काहीशी गडगडली सध्या संघाची धावसंख्या 38 व्या षटकामध्ये 4 गडी बाद 293 धावा 

99 धावांवर स्टोक्स बाद

बेन स्टोक्स 99 धावा करुन शतकापासून अवघी एक धाव मागं असताना तंबूत परतला. 52 चेंडूंमध्ये त्यानं 99 धावांची खेळी खेळत भारतीय गोलंदाजांना अडचणीत आणलं होतं. या खेळीत त्यानं 10 षटकार आणि 4 चौकार लगावले. 

इंग्लंडच्या फलंदाजांकडून भारतापुढं तगडं आव्हान

25 व्या षटकापर्यंत इंग्लंडचा एकच गडी माघारी परतला आहे. त्यामुळं भारतानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करत असताना इंग्लंडच्या फलंदाजांकडून चिवट झुंज दिली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. इंग्लंडची धावसंख्या 1 गडी बाद 167 धावा 

इंग्लंडला पहिला धक्का

षटकारासह बेअरस्टोनं अर्धशतक पूर्ण केलं आहे. सलगचं त्याचं हे दुसरं अर्धशतक आहे. इंग्लंडच्या संघानं 17 व्या षटकामध्ये पहिला गडी गमावला आहे. रॉय 52 चेंडूंमध्ये 55 धावा बनवून तंबूत परतला. 

 राहुल शतकानंतर बाद तर पंतही 77 धावांवर परतला

 राहुल शतकानंतर बाद तर पंतही 77 धावांवर परतला, टीम इंडियाच्या 47 षटकांनंतर 308 धावा

 ऋषभ पंत शानदार अर्धशतक

 ऋषभ पंत शानदार अर्धशतक,  राहुल शतकापासून तीन धावा दूर, टीम इंडियाची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

के.एल राहुल शतकानजीक

के.एल. राहुलनं दमदार खेळीचं प्रदर्शन करत तगडी धावसंख्या रचली. शतकापासून राहुल काही धावा दूर 

टीम इंडियाच्या 200 धावा पूर्ण


IND vs ENG 2nd ODI, LIVE : टीम इंडियाच्या 200 धावा पूर्ण, राहुल शतकाच्या जवळ, ऋषभ पंतही स्थिरावला https://marathi.abplive.com/sports/india-vs-england-2nd-odi-score-live-updates-ind-vs-eng-odi-live-cricket-score-streaming-ind-vs-eng-pune-maharashtra-2nd-one-day-979645

कर्णधार विराट कोहली 66 धावांवर बाद

कर्णधार विराट कोहली 66 धावांवर बाद, टीम इंडियाला तिसरा धक्का, आता राहुलसह पंत मैदानात

IND vs ENG ODI : विराट कोहली बाद

रशीच्या चेंडूवर बटलरला झेल देत विराट कोहली तंबूत माघारी बरतला आहे. विराच्या जाण्यानं भारतीय संघातील एकूण तीन खेळाडू माघारी परतले आहेत. संघाच्या धावसंख्येत विराटकडून 66 धावांचं योगदान. 

IND vs ENG के.एल.राहुलचं अर्धशतक

के. एल. राहुलनं दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतकी खेळी पूर्ण केली. त्याला यामध्ये विराट कोहलीनं चांगली साथ दिली. 

कर्णधार विराट कोहलीचं अर्धशतक, कोहली आणि राहुलनं डाव सावरला

कर्णधार विराट कोहलीचं अर्धशतक, कोहली आणि राहुलनं डाव सावरला, 27.2 ओव्हरनंतर भारताची धावसंख्या 133 वर दोन विकेट्स

5 ओव्हरनंतर टीम इंडियाची धावसंख्या 66 वर दोन विकेट्स

भारत- इंग्लंड दुसरा एकदिवसीय सामना, 15 ओव्हरनंतर टीम इंडियाची धावसंख्या 66 वर दोन विकेट्स, कर्णधार विराट कोहली, केएल राहुल मैदानात

शिखर धवन पाठोपाठ रोहित शर्माही बाद, भारताची स्थिती 2 बाद 37

शिखर धवन पाठोपाठ रोहित शर्माही बाद, भारताची स्थिती 2 बाद 37, विराट कोहली सात धावांवर मैदानात

पार्श्वभूमी

India vs England 2nd OD I: भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. हा सामना दुपारी दीड वाजता सुरु होईल. तीन सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना जिंकून भारतानं 1-0 अशी आघाडी घेतलेली आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारल्यास भारताला इंग्लंडविरुद्ध क्लीन स्वीप नोंदवण्याची संधी मिळेल.


 


श्रेयस अय्यर खांद्याला दुखापत झाल्याने वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे. आता श्रेयसच्या जागेवर कोणाला संधी मिळणार यावर सगळ्यांच्या नजरा आहेत. टी-२० मध्ये चमकलेला सूर्यकुमार यादवला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.


 


कर्णधार इयॉन मॉर्गनला दुखापत झाल्याने वन डे मालिकेतून बाहेर झाला आहे. आता मॉर्गनच्या जागेवर विकेटकीपर जोस बटलर संघाचे नेतृत्त्व करणार आहेत. तर सॅम बिलिंग्स देखील दुखापतीमुळे दुसरा वनडे सामना खेळणार नाही. या दोन्ही खेळाडूंना पहिल्या वन डे सामन्या दरम्यान इजा झाली होती.


 


इयॉन मॉर्गनच्या जागेवर डेविड मलानला संधी मिळण्याची शक्यात आहे. मलान तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची अधिक शक्यता आहे. तर सॅम बिलिंग्सच्या जागेवर लियाम लिविंगस्टोनला वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते असे बोलले जात आहे.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.