Ind vs Eng 1st T20 LIVE Score : पाहा पहिल्या टी20 सामन्यातील सर्व लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

India vs England 1st T20 Score Live Updates भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये शुक्रवारपासून पाच सामन्यांच्या टी20 क्रिकेट मालिकेची सुरुवात होत आहे. मालिकेतील सर्व, पाचही सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Mar 2021 06:35 PM
Ind vs Eng 1st T20 LIVE Score भारतीय संघाचा पराभव

124 धावांचा पाठलाग करत मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघानं यजमान संघावर 8 गडी राखत विजय मिळवला 

IND vs ENG, LIVE Score इंग्लंडचा दुसरा गडी बाद

वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर जेसन रॉय एलबीडबब्ल्यू. एका धावेनं हुकलं अर्धशतक  

भारताची अवस्था वाईट, इंग्लंडला विजयासाठी 83 धावांची आवश्यकता

अक्षर पटेलच्या षटकात 13 धावा आल्या. इंग्लंडने पाच षटकांत 42 धावा केल्या आहेत. जेसन रॉय 24 धावांवर खेळत आहे तर बटलर 18 धावांवर पोहोचला आहे. इंग्लंडला आता 15 षटकांत विजयासाठी 83 धावांची गरज आहे आणि त्यांच्या हातात 10 विकेट आहेत.

India vs England T20 LIVE Score भारताची धावसंख्या 124-7

20 षटकांमध्ये भारतीय क्रिकेट संघाकडून 124 धावा. 7 गडी गमावत इंग्लंडच्या संघापुढे भारताकडून 125 धावांचं आव्हान 

IND vs ENG, T20 LIVE श्रेयस अय्यर झेलबाद

जॉर्डनच्या चेंडूवर सीमारेषेपाशीच्या खेळाडूच्या हाती झेल देत श्रेयस अय्यर 67 धावांवर बाद. भारताचे 7 खेळाडू माघारी 

India vs England T20 LIVE Score शार्दुल ठाकूर खातं न उघडताच माघारी

पांड्या माघारी गेल्यानंतर शार्दुल ठाकूर खेळपट्टीवर दाखल झाला. पण, पहिल्याच चेंडूवर जोरदार फटका मारण्याची चूक करत त्यानं हा डाव गमावला. ठाकूरच्या जाण्यानं भारताचे 6 गडी तंबूत परत 

India vs England T20 LIVE भारतीय फलंदाजीची फळी अडचणीत

हार्दीक पांड्या चुकीचा फटका मारुन झेलबाद झाल्यामुळं आता भारतीय फलंदाजीची फळी अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे. 

India vs England T20 LIVE Score श्रेयस अय्यरची अर्धशतकी खेळी

एकिकडे भारतीय फलंदाजीचा डाव सुरुवातीच्या काळातच कोलमडताना दिसत असतानाच दुसरीकडे श्रेयस अय्यरनं अर्धशतकी खेळी पूर्ण केली. हार्दीक पांड्यानं दुसऱ्या बाजुनं त्याला पाठिंबा दिला. 

IND vs ENG, LIVE Score भारताचा चौथा गडी बाद

भारतीय संघातील चौथा गडी बाद. 21 धावांवर ऋषभ पंत झेलबाद 

India vs England T20 LIVE Score भारताची धावसंख्या...

सातव्या षटकापर्यंत भारताची धावसंख्या 3 गडी बाद, 24 धावा 

IND vs ENG, LIVE Score भारताची खराब सुरुवात, धवनही माघारी

भारतीय संघाची सुरुवात अपेक्षेप्रमाणं झाली नसून पहिल्याच षटकापासून सामन्यावर इंग्लंडच्या संघाचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्याच काही मिनिटांमध्ये शिखर धवनच्या रुपात भारतानं तिसरा गडीही गमावला

IND vs ENG, T20 LIVE पंत आणि धवनच्या हाती संघाच्या फलंदाजीची धुरा

सुरुवातीच्याच षटकांमध्ये विराट कोहली आणि के.एल. राहुल या दोघांनाही माघारी परतावं लागलं. ज्यानंतर आता ऋषभ पंत आणि शिखर धवन यांच्यावर भारतीय संघाच्या फलंदाजीची धुरा आहे. 

India vs England T20 LIVE Score भारताचा दुसऱा खेळाडूही तंबूत परत

कर्णधार विराट कोहली अगदी स्वस्तातच तंबूत परतल्यामुळं भारतीय संघाला दुसरा धक्का मिळाला आहे. आदिल रशिदच्या चेंडूवर विराट कोहली झेलबाद. 

IND vs ENG, LIVE Score भारताला पहिला धक्का

जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर पहिल्याच षटकात के.एल.राहुल त्रिफळाचीत. भारताला पहिला धक्का 

India vs England T20 LIVE भारताचे सलामीवीर खेळपट्टीवर दाखल

शिखर धवन आणि के.एल. राहुल खेळपट्टीवर दाखल. रोहित शर्माला वगळण्यात आल्यामुळं धवनला संघात स्थान 

IND vs ENG, T20 LIVE : रोहित शर्माला या सामन्यातून वगळण्यात आलं आहे.

संघ व्यवस्थापनाने रोहित शर्मा याला पहिल्या दोन टी20 सामन्यांतून वगळण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. अखेरच्या काही क्षणांमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

India vs England T20 LIVE : दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन

India Playing 11: शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर आणि अक्षर पटेल.


England Playing 11: जेसन रॉय, जोस बटलर (यष्टीरक्षक), डेविड मलान, जॉनी बेयरस्टो, इयॉन मॉर्गन (कर्णधार), बेन स्टोक्स, मार्क वुड, सैम करन, क्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद.

इंग्लंडनं जिंकली नाणेफेक

इंग्लंडनं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघातील सलामीवर फलंदाजीसाठी काही क्षणांत खेळपट्टीवर येणार 

काही क्षणांत टी20 सामन्याला सुरुवात

पार्श्वभूमी

India vs England 1st T20 Score Live Updates भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये शुक्रवारपासून पाच सामन्यांच्या टी20 क्रिकेट मालिकेची सुरुवात होत आहे. मालिकेतील सर्व, पाचही सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. गुजरात क्रिकेट बोर्डानं 50 टक्के क्रीडारसिकांच्या उपस्थिती सामन्याचं आयोजन केलं आहे. 


कसोटी मालिकेमध्ये पाहुण्या इंग्लंडच्या संघाचा दारुण पराभव केल्यामुळं भारतीय क्रिकेटपटूंचा आत्मविश्वास सहाजिकच द्विगुणित झाला आहे. तर, भारतीय संघानं दिलेली मात पाहता आता टी20 सामन्यांमध्ये यजमानांना नमवण्याच्याच हेतूनं इंग्लंडचा संघ मैदानात उतरणार आहे. 


Ind vs Eng | टी20 क्रिकेट संघात अश्विनला स्थान नाहीच? विराटच्या उत्तरानं वेधलं लक्ष 


कर्णधार विराट कोहलीनं दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्मा आणि के.एल. राहुल ही सलामीची जोडी भारतीय फलंदाजीच्या फळीचं नेतृत्त्वं करेल. टी20 मालिकेसाठी संघात ऋषभ पंतचंही स्थान निश्चित असल्याचं म्हटलं जात आहे. तर, चौथ्या क्रमांकासाठी सूर्यकुमार यादव किंवा श्रेयस अय्यर यांच्यापैकी कोणा एकाला संधी देण्यात येणार आहे. 


इंग्लंडच्या वतीनं जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टो ही जोडी सलामीच्या फलंदाजीसाठी मैदानात येईल. तर, जोस बटलर आणि बेन स्टोक्स हे फिनिशरच्या भूमिकेत दिसतील. त्यामुळं टी20 मालिका अटीतटीची होणार यात शंका नाही. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.