India vs Bangladesh : पुण्यामध्ये सुरू असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यामध्ये (India vs Bangladesh) टीम इंडियाने पुन्हा एकदा करून दाखवताना जोरदार कमबॅक केलं आहे. बांगलादेशचा हंगामी कर्णधार नजमूल शांतोने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. बांगलादेश डावाची सुरुवात तन्झिद हसन आणि लिट्टन दास यांनी केली. दोघांनीही दमदार खेळी करताना भारताला जवळपास 15 व्या षटकापर्यंत विकेटसाठी प्रतीक्षा करायला भाग पाडले.






पंधराव्या षटकात कुलदीप यादवने भारताला पहिले यश मिळवून दिले. तन्झिद आणि लिट्टन दासने पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. त्यानंतर बांगलादेशला दुसरा झटका रवींद्र जडेजाने दिला. कॅप्टन नजमूल शांतोला त्याने बादे. त्यानंतर मेहदी हसन मिराजचा अडथळा मोहम्मद सिराजने दूर केला. लोकेश राहुलने डावीकडे झेपावत अप्रतिम झेल घेतला. 






 


त्यामुळे बांगलादेशची बिनबाद 93 वरून 3 बाद 129 अशी स्थिती झाली. जडेजाने पुन्हा एकदा मदतीला धावून येत लिट्टन दासचा सर्वात मोठा अडथळा दूर केला. लिट्टन दास आक्रमक पवित्रा घेण्याचा प्रयत्न करत असतानाच जडेजाच्या चालीमध्ये फसला. लिट्टन दास 66 धावांवर बाद झाला, तर तन्झिद हसन 51 धावांवर बाद झाला. मागील तीन सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तान, अफगाणिस्तान तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने त्याच पद्धतीने बाजी पलटून विजय मिळवला, त्याच पद्धतीने या सामन्यामध्ये वापसी केली आहे. 






ओव्हर 1-10 : बांगलादेश


> बुमराहने तन्झिदला जाळ्यात अडकवले पण रिव्ह्यू केला नाही, त्यामुळे विकेटसाठी प्रतीक्षा
> सिराजच्या षटकात दोन चौकार मारून लिटनचा आत्मविश्वास वाढला
> बॉल थांबवण्याचा प्रयत्न करताना हार्दिक पांड्या जखमी 
> तन्झिदने ठाकूरच्या एकाच ओव्हरमध्ये 16 धावा ठोकल्या 
> 63 धावा एकही विकेट न गमावता जोडल्या 


ओव्हर 11-20 : भारत


> भारताचे सामन्यावर नियंत्रण
> तन्झिदचे पहिले वनडे अर्धशतक
> कुलदीपला पहिली विकेट, तन्झिदची विकेट 


ओव्हर 21-30 : भारत


> लिटन दासचे ६२ चेंडूंत अर्धशतक
> तगड्या गोलंदाजीने भारताची पकड
> लिटनचा जडेजाविरुद्ध आक्रमक पवित्रा
> मेहदी हसनचा केएल राहुलकडून अप्रतिम कॅच 
> 66 धावांवर लिटन आऊट; जडेजाची दुसरी विकेट
> बांगलादेशने 2 गडी गमावून 33 धावा केल्या


बांगलादेश विरुद्ध भारतासाठी सर्वोच्च सलामीची भागीदारी


120 - लिटन दास, मेहदी हसन मिराझ, दुबई, 2018
102 - सौम्या सरकार, तमीम इक्बाल, मीरपूर, 2015
93 - लिटन दास, तन्झीद हसन, पुणे, 2023
80 - इमरुल कायस, तमीम इक्बाल, मीरपूर, 2010


इतर महत्वाच्या बातम्या