Virat Kohli On Pakistan Bowling : शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. आशिया चषकातील हा सर्वात जास्त हायहोल्टेज सामना म्हणून पाहिले जातेय. या सामन्याकडे संपूर्ण क्रीडा चाहत्यांच्या नजरा आहेत. श्रीलंकेतील कँडी येथीलमें पल्लेकेले क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तानचा थरार रंगणार आहे. मैदानावरील सामन्याआधी मैदानाबाहेर वक्तव्यांची मालिका सुरु झाली आहे.  पाकिस्तान संघाने नेपाळविरोधात दमदार कामगिरी केली. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने २३८ धावांनी विजय मिळवला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात विराट कोहली कशी कामगिरी करणार.. याकडे सर्वांच्या नजरा आहेत. या सामन्यापूर्वी विराट कोहलीने महत्वाचे वक्तव्य केले. या वक्तव्यातून विराट कोहलीने भारतीय संघाला सावध खेळण्याचा सल्लाच दिला आहे. पाकिस्तानची गोलंदाजी दमदार आहे, कोणत्याही क्षणी सामना फिरवू शकते. त्यामुळे सावधपणे खेळण्याची गरज आहे, असे विराट कोहली म्हणाला. 


पाकिस्तानविरोधात विराट कोहलीने नेहमीच सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन केलेय. पाकिस्तानच्या संघाविरोधात विराट कोहलीने धावांचा पाऊस पाडलाय. पण कोहलीने पाकिस्तानविरोधात भारतीय संघाला सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.पाकिस्तानच्या गोलंदाजी आक्रमणाचे कौतुक करताना विराट कोहलीने आपल्या सहकाऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.  


पाकिस्तानविरोधातील सामन्यापूर्वी विराट कोहली याने स्टार स्पोर्ट्सवर झालेल्या बातचीतमध्ये महत्वाचे विधान केले. विराट म्हणाला की, पाकिस्तानची गोलंदाजी मजबूत आणि भेदक असल्याचे मला वाटतेय. पाकिस्तानची गोलंदाजी निश्चितपणे प्रभाव दर्शवते. पाकिस्तानचा गोलंदाजीचा क्रम चांगला आहे.  तो कोणत्याही सामन्याला कलाटणी देऊ शकतो. त्यामुळे त्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला सर्वोत्तम देणे आवश्यक आहे, असा माझा विश्वास आहे.


विराटची चर्चा - 
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान विराट कोहलीची सर्वाधिक चर्चा होते. विराट कोहली याने पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. आशिया चषकातील विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या पाकिस्तानविरोधातच आहे. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या सामन्यातही विराट कोहलीकडून मोट्या खेळीची आपेक्षा असेल. विराट कोहली सध्या भन्नाट फॉर्मात आहे. पाकिस्तानविरोधात विराट कोहलीने ५० पेक्षा जास्त सरासरीने धावांचा पाऊस पाडला आहे. विराट कोहली भारतासाठी मॅच विनिंग खेळी करु शकतो.  विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा आहेत. 


विराट कोहलने २०२३ मध्ये दमदार कामगिरी केली आहे. एकदिवसीय सामन्यात त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. या वर्षात झालेल्या ९ डावात विराट कोहलीने ५४ च्या सरासरीने ४२७ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि एका अर्धशतकाचा समाेश आहे. पाकिस्तानविरोधात विराट कोहलीने १३ सामन्यात 536 धावा चोपल्या आहेत.