राजकोट: न्यूझीलंडने दुसऱ्या टी ट्वेण्टी सामन्यात भारतीय संघाचा पराभव करुन मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.


या सामन्यात एकटा जसप्रीत बुमरा सोडला तर अन्य कोणताही भारतीय गोलंदाज चालला नाही. कारकिर्दीतील पहिलाच टी ट्वेण्टी सामना खेळणाऱ्या भारताच्या मोहम्मद सिराजला तर 4 षटकात तब्बल 53 धावा कुटल्या.

रिक्षाचालकाचा मुलगा टीम इंडियात, सिराजची थक्क करणारी...

याबाबत बुमराला विचारलं असता, तो म्हणाला, “सिराजची ही पहिलीच मॅच होती. राजकोटमधील खेळपट्टी अवघड होती. आम्ही नव्या चेंडूने गोलंदाजी करत होतो, त्यामुळे चेंडू सहज बॅटवर जात होता. अवघड खेळपट्टीवर गोलंदाजी करणं कठीण होतं. सिराज नवखा आहे, पण तो काळानुरुप शिकेल”



दरम्यान, या सामन्यात बुमराने न्यूझीलंडच्या धावगतीवर काहीसा अंकूश लावला. बुमराने 4 षटकात 23 धावा दिल्या. तर भुवनेश्वर कुमारने 4 षटकात 29 धावा दिल्या. या दोघांनाही विकेट घेण्यात अपयश आलं.

न्यूझीलंडने 20 षटकात तब्बल 196 धावा केल्या होत्या. त्यांनी केवळ दोनच फलंदाज गमावले होते. या दोन विकेट मोहम्मद सिराज आणि यजुवेंद्र चहलने पटकावल्या होत्या.

न्यूझीलंडकडून कोलिन मुनरोने केवळ 58 चेंडूत 7 चौकार आणि 7 षटकारांसह नाबाद 109 धावा ठोकल्या. मुनरोच्या या शतकामुळेच न्यूझीलंडला धावांचा डोंगर उभा करता आला. भारताला हे आव्हान पेलवलं नाही, त्यामुळे भारताचा 40 धावांनी पराभव झाला.

संबंधित बातम्या

निळी जर्सी घालून राष्ट्रगीत म्हणताना मोहम्मद सिराजला अश्रू अनावर

रिक्षाचालकाचा मुलगा टीम इंडियात, सिराजची थक्क करणारी...

IPL : 500 रुपये ते 2 कोटी 60 लाख रुपये, मोहम्मद सिराजचा संघर्षमय प्रवास