बंगळुरु : कर्णधार विराट कोहलीच्या टीम इंडियाने बंगळुरुच्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीत इंग्लंडचा 75 धावांनी धुव्वा उडवून तीन सामन्यांची टी ट्वेंटी मालिका 2-1 ने खिशात घातली आहे. 4 षटकात 25 धावा देऊन 6 विकेट्स घेणारा यजुवेंद्र चहल या विजयाचा खरा हिरो ठरला.

इंग्लंडकडून जेसन रॉय 32, ज्यो रुट 42 आणि कर्णधार इयॉन मॉर्गन 40 यांनी इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र यजुवेंद्र चहलच्या फिरकीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांची जादू चालू शकली नाही. चहलने केवळ 25 धावा देत इंग्लंडच्या सहा फलंदाजांना माघारी धाडलं.

इंग्लंडच्या 119 धावांवर 2 विकेट होत्या. मात्र मॉर्गन आऊट झाल्यानंतर पुढच्या 8 धावांमध्ये इंग्लंडचा अख्खा संघ तंबूत परतला. क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा 8 विकेट अशा पद्धतीने घेण्यात आल्या. इंग्लंडने केवळ 8 धावांमध्ये 8 फलंदाज गमावले.

क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी 71 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात असा प्रसंग आला होता. न्यूझीलंडने केवळ 5 धावांमध्ये 8 विकेट गमावल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1946 नंतर 2017 पर्यंत एवढं खराब प्रदर्शन करणारा इंग्लंड पहिलाच संघ ठरला आहे.

संबंधित बातम्या :


तिन्ही फॉर्मॅटमध्ये पदार्पणातच मालिका खिशात, नाम है कोहली! .


चहल 6 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज!


चहल हिरो, टीम इंडियाचा इंग्लंडवर 75 धावांनी विजय!