आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत दोन वर्षांपूर्वी ओव्हल मैदानावर भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ समोरासमोर आले होते. यावेळी पाकिस्तानने 180 धावांनी टीम इंडियाचा धुव्वा उडवला होता. त्यामुळे भारत पराभवाचा वचपा काढण्यासाठी उत्सुक असेल. मँचेस्टरमध्ये ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात रविवारी 16 जून 2019 रोजी भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे.
आयसीसी क्रिकेट विश्वचषक पुढच्या वर्षी इंग्लंड आणि वेल्समध्ये होणार आहे. यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेतील सामन्याने 30 मे 2018 रोजी वर्ल्डकपचा शुभारंभ होईल. पाच जूनला द. आफ्रिकेविरुद्ध भारताचा पहिला सामना रंगणार आहे. 14 जुलै रोजी
ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या आठ संघांनी आयसीसीच्या वनडे क्रमवारीनुसार 30 सप्टेंबर 2017 रोजीच विश्वचषक स्पर्धेत स्थान निश्चित केलं होतं. तर वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान या दोन संघांनी मार्च महिन्यात क्वॉलिफायर स्पर्धा पार करुन जागा मिळवली.
भारताचे सामने :
दिनांक - प्रतिस्पर्धी संघ
बुधवार 5 जून - द. आफ्रिका
रविवार 9 जून - ऑस्ट्रेलिया
गुरुवार 13 जून - न्यूझीलंड
रविवार 16 जून - पाकिस्तान
शनिवार 22 जून - अफगाणिस्तान
गुरुवार 27 जून - वेस्ट इंडिज
रविवार 30 जून - इंग्लंड
मंगळवार 2 जुलै - बांगलादेश
शनिवार 6 जुलै - श्रीलंका
मंगळवार 9 जुलै - उपान्त्य फेरी 1
बुधवार 10 जुलै - राखीव दिवस
गुरुवार 11 जुलै - उपान्त्य फेरी 2
शुक्रवार 12 जुलै - राखीव दिवस
रविवार 14 जुलै - अंतिम फेरी