मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गौतम गंभीरनं तब्बल दोन वर्षानंतर पुनरागमन केलं. त्यानंतर वनडे संघात युवराज सिंहला संधी मिळू शकते अशी चर्चा सुरु होती. मात्र, आज निवड करण्यात आलेल्या वनडे संघात युवराज सिंहला स्थान देण्यात आलेलं नाही.
काही दिवसांपूर्वीच बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) करण्यात आलेल्या फिटनेस टेस्टमध्ये युवराज उत्तीर्ण ठरला होता. त्यामुळे वनडे संघात परतण्याच्या त्याचा आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, निवड समितीनं न्यूझीलंडविरुद्ध पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे.
बंगळुरुमध्ये झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये गौतम गंभीर आणि युवराज सिंह हे दोघेही फिट ठरले होते. त्यानंतर गंभीरनं कसोटी संघात पुनरागमनही केलं. मात्र, युवराज सिंहला वनडे संघात येण्यासाठी अजूनही वाट पाहावी लागणार आहे.
टीम इंडिया: धोनी (कर्णधार), विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, सुरेश रैना, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जयंत यादव, अमित मिश्रा, मनदीप सिंह, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, उमेश यादव, केदार जाधव