मुंबई : भारतीय फुटबॉल संघानं फिफाच्या जागतिक क्रमवारीत शंभराव्या स्थानावर झेप घेतली आहे. गेल्या 21 वर्षांत भारतीय संघानं फिफाच्या क्रमवारीत मिळवलेलं हे सर्वोत्तम स्थान आहे.
भारताची फिफा क्रमवारीतली सर्वोत्तम कामगिरी ही 96 व्या स्थानाची आहे. भारतीय संघानं फेब्रुवारी 1996मध्ये फिफा क्रमवारीत 96 वं स्थान मिळवलं होतं. त्यानंतर 1996 सालच्या एप्रिल महिन्यात भारताची फिफा क्रमवारीत शंभराव्या स्थानावर घसरण झाली. त्यानंतर तब्बल 21 वर्षांनी भारतीय संघ पुन्हा शंभराव्या स्थानावर दाखल झाला आहे.
फिफाच्या क्रमवारीत पहिल्या शंभर संघांमध्ये स्थान मिळवण्याची भारताची स्वातंत्र्यानंतर ही केवळ सहावी वेळ आहे. आशियाई क्रमवारीत भारतानं आपलं अकरावं स्थान कायम राखलं आहे.