मुंबई: महेंद्रसिंग धोनीच्या टीम इंडियानं वन डे सामन्यांसाठीच्या आयसीसी क्रमवारीत आपलं तिसरं स्थान कायम राखलं आहे. वन डे विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियानंही आयसीसी क्रमवारीत आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे.
ऑस्ट्रेलियानं तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजचा 58 धावांनी धुव्वा उडवून, आयसीसी क्रमवारीतलं अव्वल स्थान आपल्याकडून निसटू दिलं नाही. वन डे सामन्यांच्या आयसीसी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 123 गुण असून, न्यूझीलंड 113 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
तिसऱ्या स्थानावरच्या टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात समान 110 गुणच आहेत. पण आयसीसी क्रमवारीत दक्षिण आफ्रिका किंचित पिछाडीवर आहे. वन डे सामन्यांसाठीच्या फलंदाजांच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स पहिल्या आणि भारताचा विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे.