विराट कोहली फिट, आयपीएलमध्ये मुंबईविरुद्ध पुनरागमन करणार
एबीपी माझा वेब टीम | 13 Apr 2017 12:06 PM (IST)
मुंबई : टीम इंडिया आणि आयपीएलमधील आरसीबी संघाचा कर्णधार विराट कोहलीला मॅच खेळण्यासाठी फिट घोषित करण्यात आलं आहे. आयपीएलमधल्या शुक्रवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध होणाऱ्या सामन्यात कोहली खेळणार आहे. कोहली उजव्या खांद्याच्या दुखापतीतून सावरला असून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने कोहली खेळण्यास तंदुरुस्त असल्याचं स्पष्ट केलं. आयपीएलच्या रणांगणात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमधला सामना शुक्रवार 14 एप्रिल रोजी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.