हरारेच्या मैदानातील दुसऱ्या सामन्यातही भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा करुन झिम्बाब्वेला 126 धावांतच रोखलं. यजुवेंद्र चहलने तीन तर बरिंदर सरन आणि धवल कुलकर्णीने प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या.
विजयासाठी 127 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर लोकेश राहुल 33 धावांवर माघारी परतला. पण करुण नायरने अंबाती रायुडूच्या साथीने 67 धावांची भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. नायरने 39 धावांची तर रायुडूने नाबाद 41 धावांची खेळी केली.