गोलकीपर आणि कर्णधार श्रीजेशनं रोखलेल्या पेनल्टीनं भारताला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीचं तिकीट मिळवून दिलं आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण कोरियावर पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 अशी मात केली.


श्रीजेशनं पाचव्या पेनल्टीवर दक्षिण कोरियाचा गोल रोखून भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. त्याआधी निर्धारीत वेळेत दोन्ही संघांमधला सामना 2-2 असा बरोबरीत सुटला होता.

निर्धारीत वेळेत भारताकडून तलविंदर सिंगनं 15व्या तर रमणदीप सिंगनं 55 व्या मिनिटाला गोल केले होते.