मुंबई : बांगलादेश 'अ' संघाबरोबर भारतात होणाऱ्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी भारतीय 'अ' संघाची धुरा मराठमोळ्या अनुजा पाटीलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. अनुजा पाटील ही मूळची कोल्हापूरची आहे.
येत्या डिसेंबर महिन्यात कर्नाटक येथे बांग्लादेशच्या 'अ' महिला क्रिकेट संघासोबत भारतीय महिलांची 'अ' टीम भिडणार आहे. या मालिकेत 2 डिसेंबरपासून तीन एकदिवसीय सामने हुबळी येथे खेळले जाणार आहे. तर 12 डिसेंबरपासून तीन टी 20 सामने बेळगावात होणार आहेत.
त्याआधी बांगलादेशचा संघ 26 आणि 28 नोव्हेंबरला अलुरमध्ये दोन सराव सामनेही खेळणार आहे.
बीसीसीआयने काल (22 नोव्हेंबर) भारतीय 'अ' संघाची घोषणा केली. यातील अभिमानाची बाब म्हणजे महाराष्ट्राच्या दोन लेकींची संघात निवड झाली आहे. कोल्हापूरच्या अनुजा पाटीलकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी असेल. तर बीडच्या कविता पाटीलनेही संघात स्थान मिळावलं आहे.
कोल्हापूरच्या पोरीचा ऑस्ट्रेलियात डंका, अनुजा पाटील टीम इंडियाचा कणा!
बीडच्या कविता पाटीलची भारतीय महिला क्रिकेट 'अ' संघात निवड
देशात महिला क्रिकेट अधिक सशक्त करण्यासाठी ही मालिका खेळवणार असल्याचं बीसीसीआयने म्हटलं आहे.
अनुजा पाटील वन डेसह ट्वेण्टी 20 संघाचंही नेतृत्त्व करणार आहे. अनुजाने यापूर्वी टी 20 सामन्यात महिला संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अनुजाने छाप पाडली होती.
वनडे संघ
अनुजा पाटील (कर्णधार), एस. मेघना, नेहा तानवार, नझुहत परवीन, कविता पाटील, प्रती बोस, शिवांगी राज, देविका वैदय, वी आर वनिता, जेमिमा रॉड्रिग्ज, निनू चौधरी, मानसी जोशी, सुकन्या परिदा, प्रियांका प्रियदर्शनी, एम.डी.थिरुशकामिनी.
ट्वेण्टी 20 संघ
अनुजा पाटील (कर्णधार), एस. मेघना,जेमिमा रॉड्रिग्ज, स्वागतिका राठ, पूजा वस्त्रकार, टी पी कानवार, सोनी यादव, राम्या दोशी, वी आर वनिता, डी हेमलता, देविका वैदय, तान्या भाटिया, मेघना सिंह, राधा यादव, तरन्नुम पठाण.