मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधला तिसरा टी20 सामना आज चेन्नईच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. पहिल्या दोन सामन्यांतील विजयानंतर टीम इंडिया मालिकेवरही निर्विवाद वर्चस्व गाजवण्यास सज्ज झाली आहे.
लखनौ येथील दुसऱ्या टी20 सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या दमदार शतकी खेळीमुळे भारताने विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता चेन्नईचा सामना जिंकत मालिकेवर भारताचे निर्विवाद वर्चस्व मिळवण्याचा रोहित शर्मा आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रयत्न राहिल. या सामन्याचा विचार केल्यास वेस्ट इंडिजपेक्षा भारताचेच पारडे जड असल्याचे दिसत आहे.
रोहित शर्माने लखनौ येथील सामना एक हाती गाजवला असला तरी अन्य फलंदाजांकडून त्याला पुरेशी चांगली साथ लाभत नाही. शिखर धवन, लोकेश राहुल, ऋषभ पंत यांना अजूनही आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
टीम इंडियानं पहिले दोन्ही सामने जिंकून तीन सामन्यांची मालिका आधीच खिशात घातली आहे. पण आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या पूर्वतयारीच्या दृष्टीनं भारतीय संघ या सामन्यात प्रयोग करुन पाहू शकतो. श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज नदीम यांच्यापैकी एकदोघांना विंडीजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात संधी मिळू शकते.
बीसीसीआयच्या निवड समितीनं जसप्रीत बुमरा, उमेश यादव आणि कुलदीप यादव यांना या सामन्यातून विश्रांती दिली आहे. त्या तिघांऐवजी सिद्धार्थ कौलचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, कृणाल पंडय़ा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, खलील अहमद, उमेश यादव, शाहबाझ नदीम.
वेस्ट इंडिज : कालरेस ब्रेथवेट (कर्णधार), डॅरेन ब्राव्हो, शिमरॉन हेटमेयर, शाय होप, ओबेड मॅककॉय, कीमो पॉल, खारी पाएरे, किरॉन पोलार्ड, निकोलस, पूरन, रोवमन पॉवेल, दिनेश रामदीन, शेर्फने रुदरफोर्ड, ओशेन थॉमस.
अखेरच्या सामन्यात टीम इंडिया वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप देणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Nov 2018 08:20 AM (IST)
लखनौ येथील दुसऱ्या टी20 सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या दमदार शतकी खेळीमुळे भारताने विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता चेन्नईचा सामना जिंकत मालिकेवर भारताचे निर्विवाद वर्चस्व मिळवण्याचा रोहित शर्मा आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रयत्न राहिल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -