IND vs NZ WTC Final Live Updates: न्यूझीलॅंडनं जिंकला पहिला कसोटी वर्ल्डकप

World Test Championship Final 2021 : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आजपासून जागतिक कसोटी क्रिकेट अर्थात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जात आहे. पाहा या सामन्याचे लाईव्ह अपडेट...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Jun 2021 11:09 PM
न्यूझीलॅंडनं जिंकला पहिला कसोटी वर्ल्डकप

IND vs NZ WTC Final Live Updates: न्यूझीलॅंडनं जिंकला पहिला कसोटी वर्ल्डकप, टीम इंडियाचा आठ गडी राखून पराभव, कर्णधार विलियमसनचं शानदार अर्धशतक  #WTCFinals #WTC2021Final  

न्यूझीलॅंडला विजयासाठी 50 धावांची गरज, टीम इंडिया पराभवाच्या छायेत, कर्णधार विलियमसन आणि रॉस टेलर मैदानात

IND vs NZ WTC Final Live Updates: न्यूझीलॅंडला विजयासाठी 50 धावांची गरज, टीम इंडिया पराभवाच्या छायेत, कर्णधार विलियमसन आणि रॉस टेलर मैदानात 

न्यूझीलॅंडचे दोन्ही सलामीवीर बाद, लॅथम 9 तर कॉन्वे 19 धावांवर बाद, न्यूझीलॅंडला विजयासाठी 93 धावांची गरज

न्यूझीलॅंडचे दोन्ही सलामीवीर बाद, लॅथम 9 तर कॉन्वे 19 धावांवर बाद, न्यूझीलॅंडला विजयासाठी 93 धावांची गरज

भारताचा दुसरा डाव 170 धावांवर गुंडाळला, न्यूझीलॅंडला विजयासाठी 139 धावांची गरज

IND vs NZ WTC Final Live Updates:भारताचा दुसरा डाव 170 धावांवर गुंडाळला, न्यूझीलॅंडला विजयासाठी 139 धावांची गरज #WTCFinals #WTC2021Final  

ऋषभ पंतनंतर रविचंद्रन अश्विनही बाद

IND vs NZ WTC Final Live Updates: ऋषभ पंतनंतर रविचंद्रन अश्विनही बाद, टीम इंडियाला आठवा धक्का, भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या #WTCFinals #WTC2021Final 

टीम इंडियाला मोठा धक्का, ऋषभ पंत 41 धावांवर बाद

IND vs NZ WTC Final Live Updates: टीम इंडियाला मोठा धक्का, ऋषभ पंत 41 धावांवर बाद,  भारताकडं 124 धावांची आघाडी 

टीम इंडियाला सहावा धक्का, रविंद्र जाडेजा 16 धावांवर बाद, भारताकडे 116 धावांची आघाडी, पंतसह अश्विन मैदानात

टीम इंडियाला सहावा धक्का, रविंद्र जाडेजा 16 धावांवर बाद, भारताकडे 116 धावांची आघाडी, पंतसह अश्विन मैदानात

IND vs NZ WTC Final Live Updates: WTC फायनलचा अंतिम दिवस, उपाहारापर्यंत टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत

IND vs NZ WTC Final Live Updates: WTC फायनलचा अंतिम दिवस, उपाहारापर्यंत टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत, पंत-जाडेजा मैदानावर   #WTCFinals #WTC2021Final  

WTC फायनलच्या अंतिम दिवसाचा खेळ सुरु, खेळाच्या सुरुवातीला भारताला दोन धक्के

WTC फायनलच्या अंतिम दिवसाचा खेळ सुरु, खेळाच्या सुरुवातीला भारताला दोन धक्के, विराट आणि पुजारा बाद, आता अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत मैदानात

महामंडळ वाटपावरून महाविकास आघाडीत मतभेद

महामंडळ वाटपावरून महाविकास आघाडीत मतभेद. महाविकास आघाडीतील तीनही पक्षाना सम-समान वाटप करणार असल्याचं काँग्रेसची भूमिका. तर आमदारांच्या संख्येवरून महामंडळ वाटप करणार असल्याचं शिवसेनेची भूमिका. महामंडळ वाटपासंदर्भात आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर आमदारांच्या संख्यानुसार महामंडळ वाटप होणार असल्याचं शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तर तीनही पक्षांना सम-समान वाटप होणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. त्यामुळे येत्या काळात महामंडळ वाटपावरून महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भारताच्या नावावर पहिले सत्र

भारताच्या नावावर पहिले सत्र
पाचव्या दिवसाचे पहिले सत्र भारताच्या नावावर झालंय. आजचा खेळ पावसामुळे एक तास उशिरा सुरू झाला. यानंतर जेव्हा टीम इंडिया गोलंदाजीसाठी आली तेव्हा त्यांनी सुरुवातीपासूनच टिच्चून गोलंदाजी केली. या सत्रात न्यूझीलंडने तीन गडी गमावले. पहिल्या सत्रात न्यूझीलंडला 23 षटकांत केवळ 34 धावा करता आल्या. कर्णधार केन विल्यमसन 19 धावांवर खेळत आहे. त्याचवेळी, कॉलिन डी ग्रँडहॉम याने अद्याप खाते उघडलेले नाही. न्यूझीलंड आता भारताच्या 82 धावांनी मागे आहे.

न्यूझीलंड विरुद्ध भारत, पाचवा दिवस : न्यूझीलंड (पहिला डाव) - 135/5 धावा (71.1 षटक)

न्यूझीलंड विरुद्ध भारत, पाचवा दिवस : न्यूझीलंड (पहिला डाव) - 135/5 धावा (71.1 षटक)

टीम इंडियाला पहिलं यश, अश्विननं घेतली लॅथमची विकेट

WTC 2021 Live Updates : टीम इंडियाला पहिलं यश, अश्विननं घेतली लॅथमची विकेट, लॅथम 30 धावांवर बाद #INDvsNZ #WTCFinal2021 

न्यूझीलॅंडची सावध सुरुवात, टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे यांची अर्धशतकी भागिदारी,  लॅथम 25 तर कॉन्वे 31 धावांवर नाबाद  .

न्यूझीलॅंडची सावध सुरुवात, टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे यांची अर्धशतकी भागिदारी,  लॅथम 25 तर कॉन्वे 31 धावांवर नाबाद  .

टीम इंडियाच्या पहिला डाव 217 धावांवर गुंडाळला, जेमिसननं घेतल्या 5 विकेट्स

WTC 2021 Live Updates : टीम इंडियाच्या पहिला डाव 217 धावांवर गुंडाळला, जेमिसननं घेतल्या 5 विकेट्स  तर बोल्ट, वॅनगरनं घेतल्या प्रत्येकी दोन विकेट्स  

उपाहारापर्यंत टीम इंडियाच्या 7 विकेट्सवर 211 धावा

WTC 2021 Live Updates : उपाहारापर्यंत टीम इंडियाच्या 7 विकेट्सवर 211 धावा, रविंद्र जाडेजा-इशांत शर्मा मैदानात, जेमिसनच्या तीन तर वॅगरनच्या दोन विकेट #WTCFinal21 

रविचंद्रन अश्विन 22 धावांवर बाद

WTC 2021 Live Updates : रविचंद्रन अश्विन 22 धावांवर बाद, टीम इंडियाच्या 200 धावा पूर्ण, 205 धावांवर भारताचे सात गडी बाद  

टीम इंडियाच्या 200 धावा पूर्ण

WTC 2021 Live Updates : टीम इंडियाच्या 200 धावा पूर्ण, रविचंद्रन अश्विन-रविंद्र जाडेजानं डाव सावरला  

उपकर्णधार अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं

WTC 2021 Live Updates : उपकर्णधार अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं, वॅनगरच्या गोलंदाजीवर अजिंक्य 49 धावांवर बाद, टीम इंडियाची स्थिती 182 धावांवर 6 विकेट्स   

टीम इंडिया पाचवा धक्का, ऋषभ पंत अवघ्या चार धावांवर बाद,

WTC 2021 Live Updates : टीम इंडिया पाचवा धक्का, ऋषभ पंत अवघ्या चार धावांवर बाद,  जेमिसननं घेतली तिसरी विकेट 

टीम इंडियाला मोठा धक्का, कर्णधार विराट कोहली 44 धावांवर बाद

WTC 2021 Live Updates : टीम इंडियाला मोठा धक्का, कर्णधार विराट कोहली 44 धावांवर बाद, जेमिसनच्या गोलंदाजीवर विराट आऊट  

काल अंधूक प्रकाशामुळे खेळात व्यत्यय

 पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे पाण्यात गेल्याने भारत आणि न्यूझीलॅंड यांच्यातील सामन्याला कालपासून सुरुवात झाली.न्यूझीलॅंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून रोहित आणि शुभमन गिलनं चांगली सुरुवात करुन दिली.काल अंधूक प्रकाशामुळे खेळात व्यत्यय आला. भारताने दुसऱ्या दिवसअखेर 64.4 षटकात 3 विकेट्स गमावत 146 धावा केल्या. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे अर्धशतकी भागीदारी रचत मैदानात आहेत. 

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु,अर्धा तास उशिरा खेळाला सुरुवात

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु,अर्धा तास उशिरा खेळाला सुरुवात, विराट कोहली- अजिंक्य रहाणे मैदानात

आजही अंधूक प्रकाशामुळे खेळात व्यत्यय

काल पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे पाण्यात गेल्याने भारत आणि न्यूझीलॅंड यांच्यातील सामन्याला आजपासून सुरुवात झाली.न्यूझीलॅंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून रोहित आणि शुभमन गिलनं चांगली सुरुवात करुन दिली. मात्र काल पावसामुळं दिवस वाया गेल्यानंतर आजही अंधूक प्रकाशामुळे खेळात व्यत्यय आला. भारताने दुसऱ्या दिवसअखेर 64.4 षटकात 3 विकेट्स  गमावत 146 धावा केल्या आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे अर्धशतकी भागीदारी रचत मैदानात आहेत. 

खराब लाईट्समुळं पुन्हा खेळ थांबला, कर्णधार विराट कोहली 44 धावांवर मैदानात

WTC 2021 Live Updates :  खराब लाईट्समुळं पुन्हा खेळ थांबला, कर्णधार विराट कोहली 44 तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे 29 धावा बनवून मैदानात, टीम इंडिया तीन बाद 146   धावा

खराब लाईट्समुळं थांबलेला खेळ पुन्हा सुरु

WTC 2021 Live Updates :  खराब लाईट्समुळं थांबलेला खेळ पुन्हा सुरु, कर्णधार विराट कोहली 40 तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे 26 धावा बनवून मैदानात   #WTCFinal  

खराब लाईट्समुळं खेळ थांबला, टीम इंडियानं केल्या तीन बाद 134 धावा

WTC 2021 Live Updates :  खराब लाईट्समुळं खेळ थांबला, टीम इंडियानं केल्या तीन बाद 134 धावा, विराट कोहली-अजिंक्य रहाणे मैदानात   #WTCFinal  

विराट कोहली, अजिंक्य रहाणेनं सावरला टीम इंडियाचा डाव

WTC 2021 Live Updates : विराट कोहली, अजिंक्य रहाणेनं सावरला टीम इंडियाचा डाव, पुजारा स्वस्तात परतल्यानंतर कोहली-रहाणे स्थिरावले, टीम इंडियाच्या 55 षटकांनंतर तीन बाद 120 धावा  #WTCFinal 

लंच ब्रेकपर्यंत टीम इंडियाच्या दोन विकेट्स वर 69 धावा

 IND vs NZ WTC Final: लंच ब्रेकपर्यंत टीम इंडियाच्या दोन विकेट्स वर 69 धावा, विराट आणि पुजारा मैदानात

टीम इंडियाला दुसरा झटका, रोहित शर्मापाठोपाठ शुभमन गिल बाद

WTC 2021 Live Updates : टीम इंडियाला दुसरा झटका, रोहित शर्मापाठोपाठ शुभमन गिल बाद, 28 धावांवर शुभमन बाद, कर्णधार कोहली आणि पुजारा मैदानात  #WTCFinal 

शुभमन गिलसह चेतेश्वर पुजारा मैदानात,

शुभमन गिलसह चेतेश्वर पुजारा मैदानात, रोहित शर्मा बाद झाल्यानंतर पुजाराकडून मोठ्या अपेक्षा

भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा 34 धावांवर बाद

WTC 2021 Live Updates :  भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा 34 धावांवर बाद, टीम इंडियाची धावसंख्या एक विकेट 62 

न्यूझीलॅंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, भारताची सावध सुरुवात, 14 षटकानंतर बिनबाद 41 धावा

न्यूझीलॅंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, भारताची सावध सुरुवात, 14 षटकानंतर बिनबाद 41 धावा

पार्श्वभूमी


WTC Final 2021 : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आजपासून जागतिक कसोटी क्रिकेट अर्थात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जात आहे. क्रीडारसिकांना फार दिवसांपासून याच दिवसाची प्रतीक्षा होती.  हा सामना भारतीय संघानं जिंकल्यास विराट कोहली याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाच्या वाट्याला आलेलं हे मोठं यश ठरणार आहे.  


कुठे पार पडणार सामना? 
WTC Final 2021 चा हा सामना साऊथम्प्टनमधील एजेस बोल या स्टेडियममध्ये सुरु आहे.


कुठे पाहता येणार सामन्याचं लाईव्ह कव्हरेज? 
भारत आणि न्यूझीलंड या संघांत खेळल्या जाणाऱ्या या महामुकाबल्याचं लाईव्ह कव्हरेज अर्थात थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1 (Star Sports), स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी एचडी वर पाहता येणार आहे. तर, या सामन्याच्या धावसंख्येबद्दलचे आणि इतरही अपडेट्स तुम्हाला एबीपी माझाच्या संकेतस्थळावरही पाहता येणार आहेत. या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग Disney + Hotstar वर पाहता येणार आहे. 


WTC 2021 final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा


दरम्यान, आजपासून सुरू होणार्‍या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा झाली आहे. बीसीसीआयने सामन्याच्या एक दिवस आधी अंतिम सामन्यात भाग घेणार्‍या 11 खेळाडूंची घोषणा केली. अंतिम सामन्यात भारताने तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 





 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.