IND vs NZ, ICC Champions Trophy 2025 Final: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy 2025) चा उत्साह अंतिम टप्प्यात आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना टीम इंडिया (Team India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात 9 मार्च रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) खेळला जाईल. टीम इंडिया यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीची प्रबळ दावेदार असल्याच्या चर्चा आहेत. पण, फायनलला टीम इंडियासमोर आलेलं आव्हान वाटतं तितकं सोपं नाही. फायनल्सला टीम इंडियासमोर न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. दरम्यान, यंदा टीम इंडिया 2017 मध्ये अपूर्ण राहिलेलं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 2017 मध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान असा फायनल्सचा सामना रंगला होता. या सामन्यात पाकिस्ताननं टीम इंडियाचा पराभव केला होता. अशातच आता टीम इंडिया स्वप्न पूर्ण करणार का? रोहितसेना चॅम्पियन ट्रॉफीचं गिफ्ट देशाला मिळवून देणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पहिल्या सामन्यापासून धुवांधार खेळी करत टीम इंडियानं फायनलपर्यंतच लक्ष अगदी सहज गाठलं. पण, आता फायनलमध्ये समोर उभा ठाकला आहे, न्यूझीलंडचा संघ. अशातच आता संपूर्ण जगाच्या नजरा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर खिळल्या आहेत. अशातच, या महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडिया न्यूझीलंडविरोधात कोणत्या शिलेदारांना मैदानत उतरवू शकते, याबाबत थोडं सविस्तर...
रोहित शर्मा, शुभमन गिल असू शकतात टीम इंडियाचे ओपनर
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात, उपकर्णधार शुभमन गिल पुन्हा एकदा कर्णधार रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करताना दिसू शकतो. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, भारतीय कर्णधार रोहित शर्मा आतापर्यंत त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये दिसला नाही. पण, ज्या अंदाजात रोहित फलंदाजी करतो, त्याचा तो अंदाज चाहत्यांना खूप आवडतोय. अशातच शुभमन गिलबाबत बोलायचं तर, त्याची बात काही औरच... चॅम्पियन ट्रॉफीच्या सर्वच्या सर्व सामन्यांत गिलनं धुवाधांर फलंदाजीनं सर्वांची मनं जिंकलीत, तर प्रतिस्पर्ध्यांना पळता भुई थोडी केली आहे. अशा परिस्थितीत, संघ व्यवस्थापन सलामी जोडीशी क्वचितच छेडछाड करेल, असं वाटत नाही.
मधल्या फळीसाठी विरोट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल
मधल्या फळीची जबाबदारी अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि उत्तम फॉर्ममध्ये असलेला युवा फलंदाज श्रेयस अय्यर यांच्या खांद्यावर असेल. डावाला आकार देण्याव्यतिरिक्त, सामना पूर्ण करण्याची आणि विकेटकीपिंगची जबाबदारी केएल राहुलवर असेल. के.एल. राहुलनं आतापर्यंत फलंदाजी करताना कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
टीम इंडियाच्या धडाकेबाज ऑलराऊंडर्सचाही असेल प्लेईंग 11 मध्ये समावेश
न्यूझीलंडचं आव्हान रोखण्यासाठी टीम इंडिया धडाकेबाज ऑलराऊंडर्ससह मैदानात उतरु शकते. हार्दिक पांड्या, अक्षय पटेल आणि रवींद्र जाडेजा यांसारखे आपल्या ताफ्यातील धडाकेबाज ऑलराऊंडर्स टीम इंडिया न्यूझीलंडविरोधात मैदानात उतरवू शकते.
दोन स्पिनर्सनाही संघात मिळू शकतं स्थान
टीम इंडिया पुन्हा एकदा आपल्या दोन स्पिनर्ससह न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरू शकते. हे दोन फिरकीपटू दुसरे तिसरे कोणी नसून सध्याचे स्टार कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती आहेत. चक्रवर्तीनं न्यूझीलंडविरुद्धच्या स्पर्धेतील साखळी सामन्यात 'पाच विकेट्स' घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत, पुन्हा एकदा कर्णधार आणि प्रशिक्षक या दोन्ही फिरकीपटूंवर विश्वास दाखवू शकतील अशी अपेक्षा आहे.
वेगवान गोलंदाज वन अँड ओनली मोहम्मद शामी
वेगवान गोलंदाजीची धुरा फॉर्मात असलेल्या मोहम्मद शामीकडे असेल. सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत शामी खूपच चांगल्या लयीत दिसत आहे. तर हार्दिक पांड्या दुसऱ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका बजावू शकतो. या स्पर्धेत पांड्यानं त्याला चांगली साथ दिली आहे.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन आणि विल ओरुक.