IND vs NZ 1st Test Day 4 : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील बंगळुरू येथे खेळला जाणारा पहिला कसोटी सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. खराब प्रकाश आणि मुसळधार पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ वेळेपूर्वीच संपला. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने केवळ 4 चेंडू खेळले, ज्यामध्ये संघाला आपले खातेही उघडता आले नाही. न्यूझीलंडला सामना जिंकण्यासाठी 107 धावा करायच्या आहेत.


तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 3 गडी गमावून 231 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी सकाळी सरफराज खान आणि ऋषभ पंत यांच्यात 177 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून पहिले दोन सत्रे भारताच्या नावावर केले. सरफराजने 150 धावा केल्या, तर ऋषभ पंत 99 धावा करून बाद झाला. मात्र यानंतर टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या.


एका सत्रात पलटला खेळ


त्यावेळी भारताने 3 विकेट गमावून 408 धावा केल्या होत्या. मात्र सरफराज खानची विकेट पडल्यानंतर टीम इंडियाची बॅटिंग संघर्ष करताना दिसली. परिस्थिती अशी होती की भारताने शेवटच्या 7 विकेट केवळ 54 धावांत गमावल्या. चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात केएल राहुलला मॅट हेन्री आणि विल्यम ओरूर्केच्या घातक गोलंदाजीसमोर केवळ 12 धावा करता आल्या, तर रवींद्र जडेजालाही केवळ 5 धावा करता आल्या. अशाप्रकारे टीम इंडियाचा दुसरा डाव 462 धावांवर आटोपला.


न्यूझीलंडसमोर 107 धावांचे लक्ष्य 


एकेकाळी भारतीय संघ खूपच मजबूत स्थितीत असल्याचे दिसत होते. मात्र चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्राने सामना न्यूझीलंडकडे हातात गेला. किवी संघाला चौथ्या डावात विजयासाठी 107 धावा करायच्या आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाहुण्या संघाला केवळ 4 चेंडू खेळता आले. न्यूझीलंडला एकही षटक खेळता आले नाही, तेव्हा मैदानावर दाट काळे ढग आले. अशा परिस्थितीत खराब प्रकाशामुळे पंचांनी वेळेआधीच स्टंप घोषित केले. काही वेळाने जोरदार पाऊस सुरू झाला.


हे ही वाचा -


Sarfaraz Khan Ind vs Nz Test : पहिल्या डावात भोपळा, दुसऱ्या डावात थेट दीडशतक; सरफराज खानचा अनोखा विक्रम