IND vs ENG, Men's Hockey: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारतीय पुरुष हॉकी संघाचा (India Men's Hockey Team) इंग्लंडविरुद्धचा सामना (India vs England) अनिर्णीत राहिला आहे. सामन्यात एका क्षणी 3-0 च्या फरकाने आघाडीवर असणारा भारत सामना नक्कीच जिंकेल असे सर्वांना वाटत होते. पण शेवटच्या दोन क्वॉर्टरमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंनी अप्रतिम खेळ दाखवत एकामागे एक गोल केले आणि सामना अखेर 4-4 च्या फरकाने अनिर्णीत सुटला.






 


कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताकडून पदकाची अपेक्षा


भारताच्या गटात घाना, इंग्लंड, वेल्स आणि कॅनडा हे संघ आहेत. पहिल्या सामन्यात भारताने घानाला मात दिल्यानंतर भारताचा यजमान इंग्लंडविरुद्धचा सामना अनिर्णीत सुटला. यानंतर भारतीय संघ येत्या 3 ऑगस्टला कॅनडाशी (India vs Canada) भिडणार आहे. तर, 4 ऑगस्टला वेल्सशी गटातील अखेरचा सामना खेळेल. सध्या बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाकडून पदकाची अपेक्षा केली जात आहे. 


घानाविरुद्ध मिळवला होता दमदार विजय


भारतीय पुरुष हॉकी संघानं त्यांच्या गटातील पहिल्याच सामन्यात सामन्यात घानाचा (IND vs GHA) 11-0 असा पराभव केला होता. या सामन्यात भारतासाठी आठ वेगवेगळ्या खेळाडूंनी गोल केले. भारतीय हॉकी संघाचा उपकर्णधार हरमनप्रीत सिंह (Harmanpreet Singh) सर्वाधिक तीन गोल केले होते.


हे देखील वाचा-