IND vs ENG 3rd Test : भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) मालिकेतील तिसऱ्या सामन्यात चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला. यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) रागाने लाल झालेला पाहायला मिळाला. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) आक्रमक खेळी करत द्विशतक झळकावले. यशस्वीने शतक पूर्ण करताच ड्रिंक्सब्रेक घेण्यात आला. या दरम्यान, यशस्वी आणि सरफराजला वाटले की, रोहित शर्माने डावच घोषित केलाय. 


यशस्वी आणि सरफराजला रोहितने झापले


यशस्वी जैस्वाल आणि सरफराज तंबूकडे जात असलेले पाहून इंग्लंडचे खेळाडूही मैदानाच्या बाहेर जाण्यासाठी सरसावले. त्यांना वाटत होते की, कर्णधार रोहित शर्मा यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाची वाट पाहतोय आणि शतक झाले की तो लगेच डाव घोषित करेल. इथेच सगळा संभ्रम निर्माण झाला. तंबूकडे परतत असलेल्या यशस्वी आणि सरफराजला रोहितने चांगलाच झापला आणि फलंदाजी करण्यासाठी परत जाण्यास सांगितले. 






रोहित शर्माने डाव घोषितच केला नव्हता


कर्णधार रोहित शर्माने डाव घोषित केलाच नव्हता. दरम्यान, यशस्वी आणि सरफराजला तंबूकडे येत असलेले पाहून रोहितने बालकणीत आला. त्याने मैदानात परत जाण्यासाठी दोन्ही फलंदाजांना इशारा केला. घडलेल्या प्रकराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. एवढेच नाही तर इंग्लंडच्या बेन डकेट स्टेडियमच्या पायऱ्याही चढला होता. कारण त्याला सलामीला फलंदाजीसाठी यायचे होते. दरम्यान, व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, रोहितने फलंदाजांना मैदानात परतण्यास सांगितले. रोहितने यावेळी हातात बूटही घेतलेले आहेत. तो पूर्णपणे तयारही झालेला नव्हता. याच कारणामुळे त्याने यशस्वी आणि सरफराजला माघारी पाठवले, असे मत चाहते व्यक्त करत आहेत. मात्र, इंग्लंडच्या संघाला देखील पुन्हा एकदा मैदानात परतावे लागले.



यशस्वीच्या द्विशतकाने इंग्लंडची धुळदाण


भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवलाय. भारताने इंग्लंडचा तब्बल 434 धावांनी धुव्वा उडवला. यशस्वी जैस्वालची द्विशतकी खेळी आणि रवींद्र जडेजाने पटकावलेल्या 5 विकेट्सच्या जोरावर टीम इंडियाने हा विजय मिळवला.


इतर महत्वाच्या बातम्या 


Yashasvi Jaiswal Ind vs Eng : अँडरसनची धुलाई, वसीम आक्रमशी बरोबरी, इंग्लंडची धुळदाण; रोहित-विराटला जमलं नाही ते यशस्वीने करुन दाखवलं