IND vs AUS U19 World Cup Final : ऑस्ट्रेलियाने पुन्हा मीठ चोळले; अंडर-19 वर्ल्डकप चौथ्यांदा खिशात घातला!

IND vs AUS U19 World Cup Final LIVE Score : अंडर-19 विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया दोनदा अंतिम फेरीत भिडले आहेत. टीम इंडियाने दोन्ही वेळा विजय मिळवला आहे.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क Last Updated: 11 Feb 2024 09:14 PM

पार्श्वभूमी

IND vs AUS U19 LIVE Blog : अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज होत आहे. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला तर कांगारूंनी पाकिस्तानला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला...More

ऑस्ट्रेलियाने पुन्हा मीठ चोळले; अंडर-19 वर्ल्डकप चौथ्यांदा खिशात घातला!

ऑस्ट्रेलियाने अंडर 19 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. फायनलमध्ये भारताचा 79 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने 84 दिवसांत दुसऱ्यांदा भारताला अंतिम फेरीत पराभूत केले आहे. याआधी टीम इंडियाला वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 7 गडी गमावून 253 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 43.5 षटकांत सर्वबाद झाला. संघाने 174 धावा केल्या. त्याचा 79 धावांनी पराभव झाला. भारताकडून आदर्श सिंगने ४७ धावांची खेळी केली. मुरुगन अभिषेकने 42 धावा केल्या. नमन तिवारी 14 धावा करून नाबाद राहिला. याआधी राज लिंबानी आणि नमन यांनीही गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली. राजने ३ बळी घेतले. नमनला 2 बळी मिळाले.



आमच्याशी कनेक्ट राहिल्याबद्दल धन्यवाद.