INDvsAUS : तब्बल 8 महिन्यांच्या कालावधीनंतर भारतीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सज्ज झाला आहे. 27 नोव्हेंबरपासून टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ही मालिका सुरू होण्यासोबतच बऱ्याच दिवसांनंतर भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग पुन्हा छोट्या पडद्यावर परतणार आहे.


ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी प्रसारण हक्क असणाऱ्या सोनी पिक्चर्स स्पोर्ट्स नेटवर्कने आपल्या लोकप्रिय शो 'एक्स्ट्रा इनिंग्स' घेऊन येत आहे. या कार्यक्रमात वीरेंद्र सेहवाग दिसणार आहे. वीरेंद्र सेहवाग व्यतिरिक्त एक्स्ट्रा इनिंग्स शोमध्ये ग्लेन मॅकग्राथ, संजय मांजरेकर, अजय जडेजा, झहीर खान, निक नाइट, मोहम्मद कैफ, मुरली कार्तिक, विवेक राजदान, अजित आगरकर आणि विजय दहिया असणार आहेत.


दोन महिन्यांचा ऑस्ट्रेलिया दौरा


हर्षा भोगले आणि अर्जुन पंडित हे या मालिकेसाठी इंग्रजी आणि हिंदी प्रेजेंटर असणार आहेत. या दोघांना साथ देण्यासाठी एरिन हॉलंड ऑन ग्राऊंड प्रेजेंटर म्हणून दिसतील. ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न आणि अ‍ॅडम गिलक्रिस्ट यांच्या कॉमेंट्री व्यतिरिक्त एसपीएसएनच्या बॅन्ड ऑफ पॅनेलिस्ट्सची कस्टमाइज्ड इंग्रजी आणि हिंदी कॉमेन्ट्रीही भारतातील प्रेक्षकांना ऐकण्यास मिळणार आहे.


India vs Australia 2020-21 Full Schedule : असा असेल भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियन दौरा, तीनही फॉर्मेटसाठी संघनिवड


एसपीएसएनने फॉक्स स्पोर्ट्स ऑस्ट्रेलियाशी करार केला आहे आणि एक्‍ट्रा इनिंग्जमध्ये अ‍ॅलन बॉर्डर, इसा गुहा आणि ब्रॅंडन ज्युलियन यासारख्या आयकॉनिक पॅनेलच्या सदस्यांचा समावेश असेल. ऑस्ट्रेलियामधील प्रेक्षकांना फॉक्स स्पोर्ट ऑस्ट्रेलियाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर एसपीएसएनच्या हिंदी कॉमेन्ट्रीचा आनंद घेता येईल.


भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेवर कोरोनाचं सावट; सुरक्षेच्या कारणास्तव खेळाडूंना न्यू साऊथ वेल्समध्ये हलवलं