IND Vs AUS 4th Test Live Score Updates | जिंकलोsss! अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाची ऑस्ट्रेलियावर मात

IND Vs AUS 4th Test Live Score Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यावर क्रीडा विश्वाचं लक्ष लागलं आहे. ब्रिस्बेनमधील गाबा मैदानात खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारतीय संघात बरेच बदल केले गेले असून, बरेच नवे चेहरे संघात मोलाचं योगदान देतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Jan 2021 01:17 PM
अजिंक्य रहाेच्या नेतृत्त्वात भारतीय संघानं चौथा आणि निर्णायक कसोटी सामना खिशात टाकला. अखेरच्या क्षणापर्यंत सामन्यानं वाढवलेली धाकधुक.
नॅथन लायनच्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदर बाद. 22 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान देऊन तंबूत माघारी
चुकीचा फटका मारत शार्दुल ठाकूर झेलबाद. नॅथन लायननं टीपला झेल.
भारतीय संघाला 5 षटकांमध्ये अवघ्या 15 धावांची आवश्यकता.
भारताची सहावी विकेट, वॉशिंग्टन सुंदर 22 धावांवर बाद
भारतीय संघातील खेळाडू तंबूत परतले असतानाच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याच्याकडून क्षेत्ररक्षणाचं कवच आणि गोलंदाजांकडून आक्रमक गोलंदाजीचा मारा
भारताचा निम्मा संघ माघारी, मयांक अग्रवाल 9 धावांवर बाद. विजयापासून अवघ्या काही धावा दूर असतानाच संघाची पडझड
ऋषभ पंतनं चौथ्या कसोटी सामन्यात अर्धशतकी खेळी करत संघात अतिशय महत्त्वपूर्ण धावांचं योगदान दिलं.
कमिन्सच्या चेंडूवर 56 धावा करणारा चेतेश्वर पुजारा बाद. भारताला चौथा झटका.
भारताची धावसंख्या 227वर असतानाच ब्रिस्बेनमध्ये पावसाला सुरुवात. पण, खेळ अद्यापही सुरुच
भारताची धावसंख्या 3 गडी बाद, 224 धावा. विजयापासून भारत 104 धावा दूर
चेतेश्वर पुजाराचं संयमी अर्धशतक. क्रीडारसिकांनी दिली दाद.
अल्पशा विश्रांतीनंतर खेळ पुन्हा सुरु. चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत खेळपट्टीवर टीकून
चहापानासाठी खेळ थांबला. भारतीय संघानं 63 षटकांच्या खेळात 183 धावा पूर्ण केल्या आहेत. आतापर्यंत संघातील 3 खेळाडू माघारी.
अतिघाईमुळं चुकीचा फटका मारण्यासाठी पुढे आलेला अजिंक्य रहाणे तंबूत माघारी. भारतीय संघाला धक्का. आतापर्यंतची धावसंख्या 3 गडी बाद 167 धावा. खेळपट्टीवर ऋषभ पंत दाखल
अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा खेळपट्टीवर, भारतीय डाव पुढे नेताना.
एक गडी गमावत भारताची धावसंख्या 107 धावा. 55 षटकांचा खेळ बाकी. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंपुढं शुभमन गिलचं आव्हान. चौकार आणि षटकारांसह संयमी खेळीचंही प्रदर्शन.
शुभमन गिलनं संयमी आणि आवश्यक तिथं आक्रमक खेळीचं प्रदर्शन करत अर्थशतकी खेळी पूर्ण केली आहे.
23 षटकांनंतर भारताची धावसंख्या 1 गडी बाद, 54 धावा
22 षटकांनंतर भारताची धावसंख्या 49. रोहित शर्मा माघारी परतल्यानंर पुजारा आणि गिलनं संयमी खेळ दाखवत काही चांगले फटकेही लगावले आहेत. ऑस्ट्रेलियाची आक्रमक गोलंदाजी सुरुच.
13 षटकांनंतर भारताची धावसंख्या 1 गडी बाद, 27 धावा. खेळपट्टीवर चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल उपस्थित.
सहाव्या षटकापर्यंत भारतानं कोणताही गडी गमावला नव्हता. पण, पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला. कमिन्सनं ऑस्ट्रेलियाला पहिला गडी बाद करुन दिला. परिणामी भारतीय संघातील रोहित शर्मा 17 धावा करुन तंबूत परतला.
मोहम्मद सिराजनं ऑस्ट्रेलियाचे पाच गडी परत पाठवत दिवस गाजवला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करत, भारतीय संघाचे खेळाडू खेळपट्टीवर दाखल झाले खरे, पण पावसानं मात्र खेळात व्यत्यय आणल्यामुळं दोनदा खेळ थांबवल्यानंतर अखेर चौथ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.
पावसामुळं ब्रिस्बेन कसोटीत पुन्हा व्यत्यय. सामना पुन्हा सुरु होण्याची शक्यता धुसर. भारतापुढं 328 धावांचं आव्हान. सध्या 1.5 षटकांमध्ये भारताची धावसंख्या 4 धावा. रोहित शर्मा, शुभमन गिल खेळपट्टीवर टीकून.
मोहम्मद सिराजला पाचवा विकेट. हेजलवुड झेलबाद. ऑस्ट्रेलिया सर्वबाद 294 धावा. यजमान संघाकडे 327 धावांची आघाडी. भारताला विजयासाठी 328 धावांची गरज
शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर नॅथनच्या चेंडूवर नॅथन लायन झेलबाद. मयांक अग्रवालनं टीपला झेल. ऑस्ट्रेलियाचा 9 वा गडी बाद.
8 गडी बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाकडे 290 धावांची आघाडी
ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का. सिराजच्या नावे आणखी एक विकेट. अवघी एक धाव करुन स्टार्क माघारी
सामन्याला पुन्हा सुरुवात.ऑस्ट्रेलियाचे 7 खेळाडू माघारी.
ब्रिस्बेनमध्ये पावसाला सुरुवात. पावसामुळं चहापानासाठीची विश्रांती निर्धारित वेळेपूर्वी घेण्यात आली. पावसाचा जोर कमी असला तरीही खेळ तूर्तास थांबवण्यात आला आहे. सध्या ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 7 गडी बाद 243 धावा.
शार्दुल ठाकूरकडून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन झेलबाद. ऋषभ पंतनं पकडला झेल. ऑस्ट्रेलियाला सातवा झटका.
शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर ग्रीन झेलबाद. रोहित शर्मानं टीपला झेल. भारताच्या हाती महत्त्वाची विकेट. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 6 गडी बाद, 227 धावा.
ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 5 गडी बाद,196 धावा. कर्णधार टीम पेन खेळपट्टीवर दाखल
स्टीव्ह स्मिथ झेलबाद. अजिंक्य रहाणेनं टीपला झेल. मोहम्मद सिराजच्या नावे विकेट.
सिराजनं सोडले दोन महत्त्वाचे झेल. स्मिथ आणि ग्रीनला सिराजकडून मिळाली आणखी एक संधी
शार्दुल आणि नटराजनवर गोलंदाजीचा बहुतांश भार. स्टीव्ह स्मिथ खेळपट्टीवर पाय घट्ट रोवून उभा. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 4 गडी बाद, 173 धावा
उपहारानंतर खेळ पुन्हा सुरु. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 153वर.
उपहारासाठी खेळ थांबला. ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या सत्रातील धावसंख्या 4 गडी बाद, 149 धावा. ऑस्ट्रेलियाकडे 182 धावांची आघाडी.
दुसऱ्या खेळीमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत हे दोन्ही संघ एकमेकांपुढं आव्हानं उभी करत आहेत. सध्याच्या घडीला दुसऱ्या खेळीत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 4 गडी बाद 140 धावा
4 गडी गमावत ऑस्ट्रेलियाकडे 160 धावांची आघाडी
सिराजला पुन्हा एक गडी बाद करण्यात यश. वेड झेलबाद. यावेळी ऋषभ पंतनं कोणतीही चूक न करता टीपला वेडचा झेल.
मोहम्मद सिराजच्या चेंडूवर लाबुशेन झेलबाद. रोहित शर्मानं टीपला झेल. भारतीय संघाला तिसरं यश. सुरुवातीच्या सत्रात भारतीय संघाचं वर्चस्व वाढताना.
ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतल्यामुळं आता खेळपट्टीवर लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ अशी जोडी उपस्थित. नव्या जोडीच्या येण्यामुळं ते खेळपट्टीवर स्थिरावण्याआधीत त्यांना माघारी धाडण्याचा भारतीय गोलंदाजांचा प्रयत्न.
वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू होणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला ऑस्ट्रेलियानं गमावलं.
शार्दुल ठाकूर उत्तम गोलंदाजी करत आहे. शार्दुलने टीम इंडियाला पहिला विकेट मिळवून दिला आहे. हॅरिस शार्दुलने टाकलेल्या चेंडूवर पंतकडून बाद झाला. टीम इंडियाने 89 धावांवर पहिला विकेट घेतला आहे. वॉर्नर 45 धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाकडे एकूण 122 धावांची आघाडी आहे.
शार्दुल आणि सुंदर गोलंदाजीसाठी आल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या धावांचा वेग थोडा कमी झाला आहे. ऑस्ट्रेलियाने 22 ओव्हर्समध्ये 82 धावा केल्या आहेत. वॉर्नर 41 आणि हॅरीस 37 धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाकडेसध्या 115 धावांची आघाडी आहे. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीच्या एका तासातच ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी जबाबदार खेळी करत धावांचा डोंगर रचला आहे.

चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं दमदार अंदाजात दुसऱ्या खेळीची सुरुवात केली. परिणामी कोणत्याही खेळाडूला न गमावता ऑस्ट्रेलियाच्या संघानं 100 धावांच्या पलीकडे ही आघाडी नेण्यात यश मिळवलं. असं असलं तरीही धावतेवेळी काहीसा अडखळणारा वॉर्नर दुखापतीमुळं अडचणीत असल्याचही पाहायला मिळत होतं.
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी दुसऱ्या खेळीला सुरुवात केली असून, आतापर्यंत संघाकडे 54 धावांची आघाडी आहे. असं असलं तरीही ब्रिस्बेन कसोटीचा तिसरा दिवस हा भारतीय खेळाडूंनी गाजवला हे नाकारता येणार नाही.
मागील काही काळापासून वॉर्नरला सूर गवसला नव्हत्या त्यामुळं या संधीचं सोन करण्याकडेच त्याचा कल दिसून येत आहे. असं झाल्यास या सामन्यात वेगानं आघाडी घेण्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाला यश मिळू शकतं.
ऑस्ट्रेलियाच्या वतीनं डेव्हिड वॉर्नर आणि हॅरिसची जोडी मैदानावर उतरली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या वतीनं दुसरी खेळी सुरु करण्यासाठी डेव्हिड वॉर्नर आणि हॅरिस मैदानात दाखल. सुरुवातीच्या षटकांसाठी भारताकडून सिराज आणि नटराजन यांच्यावर गोलंदाजीची धुरा. दुसऱ्या षटकामध्ये सिराजला ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी तीन चौकार लगावले.
भारतीय संघाची पहिली खेळी सर्वबाद 336 धावांवर गुंडाळली. हेजलवुडनं सिराजची विकेट घेत संपूर्ण भारतीय संघाला तंबूत धाडलं. या खेळीमध्ये हेजलवुडच्या नावे पाच विकेटची नोंद झाली. तर, भारताच्या वतीनं शार्दुल ठाकूर यानं सर्वाधिक 67 धावा केल्या. कारकिर्दीतील पहिल्याच कसोटी सामन्यात वॉशिग्टन सुंदर या खेळाडूनं 62 धावांचं योगदान दिलं.
संघाच्या खात्यात 186 धावा असतानाच 6 गडी तंबूत माघारी परतले होते. ज्यानंतर ठाकूर आणि सुंदर यांनी सातव्या विकेटसाठी भक्कम भागीदारी रचली. या दोन्ही खेळाडूंमध्ये 118 धावांची भागीदारी झाली. भारतीय खेळीनंतर लगेचच ऑस्ट्रेलिया दुसऱ्या खेळीसाठी मैदानात उतरत आहे. त्यामुळं ब्रिस्बेन कसोटीतील तिसऱ्या दिवशी आणखी 10 षटकांचा खेळ पाहायला मिळणार आहे.
हेजलवूडच्या चेंडूवर सिराज बाद झाल्यामुळं भारतीय संघाची धावसंख्या सर्वबाद 336 इतकी झाली आहे. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाकडे 33 धावांची आघाडी आहे.
सैनीमागोमाग सुंदर 62 धावांवर बाद. भारतीय संघाचे 9 खेळाडू तंबूत परत.
सातव्या विकेटसाठी दमदार भागीदारी केल्यानंतर शार्दुल ठाकूर बाद. कमिन्सच्या चेंडूवर गमावली विकेट. नवदीप सैनी खेळपट्टीवर दाखल.
भारतीय संघाची धावसंख्या त्रिशतकापलीकडे. सहा गडी गमावत ओलांडला हा आकडा.
शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर या दोन्ही खेळाडूंची दमदार अर्धशतकी खेळी भारतीय संघाच्या आशा पल्लवित करणारी. भारतीय संघाची धावसंख्या 6 गडी बाद, 293 धावा
चहापानापर्यंत भारतीय संघाची धावसंख्या 6 गडी बाद 253 धावा. सुंदर आणि ठाकूरमध्ये सातव्या विकेटसाठी नाबाद 67 धावांची भागीदारी. आतापर्यंत 87 धावांचा खेळ पूर्ण.
सुरुवातीला फलंदाजांनी निराश केल्यानंतर अखेर भारतीय खेळाडूंना सूर गवसताना दिसत आहे. शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरनं सावरला डाव.
भारतीय संघ अडचणींचा सामना करत असतानाच वॉशिंग्टन सुंदरनं संयमी आणि आक्रमक खेळीची सांगड घालत डाव सावरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
भारताची धावसंख्या 6 गडी बाद 187 धावा
23 धावा करुन ऋषभ पंत झेलबाद. हेझलवूडच्या चेंडूवर तंबूत परत. भारतीय संघातील सहा खेळाडू माघारी गेल्यामुळं संघाच्या अडचणींत वाढ.
मयंक अग्रवाल झेलबाद झाल्यामुळं संघाला आणखी एक धक्का. त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदर खेळपट्टीवर दाखल.
भारतीय फलंदाजांना सूर गवसण्यात अडचण येत असल्याचं पाहायला मिळत आहे. उपहारानंतर खेळ सुरु होताच संघाचा आणखी एक खेळाडू तंबूत परत.
उपहारासाठी खेळ थांबला तेव्हा भारताची धावसंख्या 4 बाद 161 धावा. ऋषभ पंत आणि मयांक अग्रवालवर संघाची धुरा.
स्टार्कच्या चेंडूवर फटका मारणाऱ्या रहाणेचा झेल वेडनं स्लीपमध्ये टीपला आणि भारतीय संघातील महत्त्वाच्या खेळाडूला माघार धाडण्यात ऑस्ट्रेलियाला यश आलं आहे. भारतीय संघाची धावसंख्या 4 गडी बाद 144 धावा. आतापर्यंत 55 षटकांचा खेळ पूर्ण.
भारताला आणखी एक धक्का, स्टार्कच्या चेंडूवर चुकीचा फटका मारायला गेलेल्या रहाणेची विकेट.
50 षटकांनंतर भारताची धावसंख्या 3 गडी बाद 130 धावा
ऑस्ट्रेलियाच्या वाट्याला मोठं यश आलं असून, भारतीय संघात यामुळं निराशेचं वातावरण पाहायला मिळत आहे. हेजलवुड बऱ्याच काळापासून पुजारापुढं आव्हानं उभी करत होता. अशातच पुजारा ऑफ स्टंपच्या बाहेर आलेल्या चेंडूला फटका मारण्याची चूक करुन बसला आणि पेननं हा झेल सहजपणे टीपला. पुजारा 25 धावांचं योगदान देऊन तंबूत परतला तेव्हा भारताची धावसंख्या 105 इतकी होती.
तिसऱ्या दिवशी भारतानं धावसंख्येचा 100चा आकडा ओलांडला. पहिल्या तासात संघाचा कोणताही खेळाडू माघारी गेला नाही.
दुसऱ्या दिवशी पावसानं व्यत्यय आणल्यानंतर आता चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली आहे.
ऑस्ट्रेलियाला 369 धावांवर रोखल्यानंतर भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. शुभमन गिलला कमिन्सनं स्वस्तात माघारी पाठवलं. तर दुसरीकडे चांगला खेळ करत असतानाच नॅथन लायनच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारुन रोहित शर्मा बाद झाला. रोहित शर्मानं 6 चौकारांच्या मदतीन 44 धावा केल्या. रोहित आणि शुभमन गिल बाद झाल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी संयमी फलंदाजी करत भारतीय संघाचा डाव सावरला. चहापनापर्यंत भारतीय संघानं दोन गड्यांच्या मोबदतल्यात 62 धावा केल्या आहेत. अखेर पावसामुळं दुसऱ्या दिवसातील खेळात व्यत्यय आणला आहे. सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण, शेवटी पावसामुळं दुसऱ्या दिवसातील अखेरचं सत्र रद्द करण्यात आलं आहे.
ब्रिस्बेनमध्ये पावसानं विश्रांती घेतल्याचं वृत्त हाती आलं आहे. सध्या पंचांनी मैदानाची पाहणीही केली आहे. त्यामुळं सामना पुन्हा सुरु होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. असं असलं तरीही, काही षटकांचं नुकसान नाकारता येत नाही. यावर पर्याय म्हणून रविवारी सामना निर्धारित वेळेपूर्वी सुरु केला जाऊ शकतो.
ब्रिस्बेनमध्ये पावसाची हजेरी, चहापानानंतरही सामना थांबलेलाच आहे. जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळं सामन्यात व्यत्यय. सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण, ऑस्ट्रेलियाची खेळपट्टी पाहता पाऊस थांबताच सामना पुन्हा सुरु होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Lyon च्या चेंडूवर रोहित शर्मा झेलबाद झाल्यामुळं त्याला माघारी परतावं लागलं. रोहितच्या रुपात भारतानं दुसरा गडी गमावला. भारताची धावसंख्या 2 गडी बाद, 60 धावा.
भारताला पहिला धक्का, पॅट कमिन्सने घेतली शुभमन गिलची विकेट. भारताची धावसंख्या 1 गडी बाद, 24 धावा.
उपहारानंतर खेळ पुन्हा सुरु. ऑस्ट्रेलियाचं आव्हान पेलत भारतीय संघ मैदानात. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीवीरांकडून भारतीय फलंदाजीची सुरुवात.
टी. नटराजनच्या चेंडूवर हेजलवूडची विकेट. ऑस्ट्रेलियाच्या संघाची धावसंख्या सर्व बाद 369 धावा. 115.2 षटकांमध्ये रचला धावांचा डोंगर
व़ॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर लायन त्रिफळाचीत. विरोधी संघ ऑस्ट्रेलियाचे 9 खेळाडू माघारी.
गोलंदाजीसोबतच नटराजन क्षेत्ररक्षणातही चपळाई दाखवत जिंकतोय क्रीडारसिकांची मनं.
एकामागोमाग एक, अवघ्या काही मिनिटांच्या अंतरानं भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या 3 खेळाडूंना माघारी धाडलं.
शार्दूल ठाकूरच्या चेंडूवर कमिन्स LBW. ऑस्ट्रेलियाच्या संघाला 315 धावांवरच रोखून धरण्याच्या प्रयत्नांत भारतीय खेळाडू
शंभर षटकांच्या खेळापर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 6 गडी बाद, 312 धावा
दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियानं दमदार खेळाचं प्रदर्शन करत त्रिशतकी धावांचा आकडा ओलांडला. तर, सामना सुरु होण्याच्या पहिल्याच तासात भारतानं विरोधी संघाचा सहावा गडी बाद केला.
पहिल्या खेळीत ऑस्ट्रेलियाच्या संघानं पूर्ण केल्या 250 धावा. पाच गडी गमावत संघानं ओलांडला 250 धावांचा आकडा. 81 षटकांच्या खेळानंतर नव्या चेंडूसह नटराजनंनं केली नवी सुरुवात.
ब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला. पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलियाने पाच विकेट्सच्या मोबदल्यात 274 धावा केल्या. मार्नस लाबुशेनने दमदार शतक केलं. त्याने 204 चेंडूत 108 धावांची खेळी केली. सध्या कॅमरुन ग्रीन 28 धावा आणि टिम पेन 38 धावा करुन नाबाद आहेत. भारताकडून टी नटराजनने दोन, तर सिराज, ठाकूर आणि सुंदरने प्रत्येकी एक विकेट घेतली.
चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ वाढीव अर्ध्या तासासाठी खेळला जाणार. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा खेळ दुपारी 1 वाजेपर्यंत खेळला जाणार.
वेड आणि लाबुशेन बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढलेल्या दिसतानाच पेन आणि ग्रीननं सांभाळली संघाची धुरा. दोघांनीही आतापर्यंत संयमी भागिदारीचं प्रदर्शन केलं आहे. तर, भारतीय संघातील खेळाडू सुंदर आणि शार्दुल प्रशंसनीय गोलंदाजी करताना दिसत आहेत.
भारतीय संघाला मोठं यश; 108 धावांच्या शतकी खेळीनंतर लाबुशेन माघारी. नटराजनला मिळाली लाबूशेनची विकेट.
ऑस्ट्रेलियाचा चौथा गडी बाद. नटराजनच्या खात्यात कसोटी क्रिकेटमधील पहिल्या विकेटची नोंद. 45 धावा करत वेड झेलबाद.
चहापानाच्या विश्रांतीनंतर खेळ पुन्हा सुरु झाला आहे. इथं ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी खेळपट्टीवर तग धरल्यामुळं आता भारतीय गोलंदाजांपुढं काही अडचणी निर्माण होताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 3 गडी बाद 180 धावा इतकी झाली आहे.
Tea सेशन अर्थात चहापानाचं सत्र ऑस्ट्रेलियासाठी फायद्याचं. उपहारानंतर ऑस्ट्रेलियानं 89 धावा केल्या. सध्या ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 3 गडी बाद 154 धावा. लाबुशेन 73 धावा, तर वेड 27 धावांसह खेळपट्टीवर अद्यापही टीकून.
44 षटकांच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 3 गडी बाद, 110 धावा. फलंदाजीसाठी खेळपट्टी फायद्याची असूनही वॉशिंग्टन सुंदर फलंदाजांपुढं ठरतोय आव्हान.
स्मिथच्या जाण्यानं ऑस्ट्रेलियाच्या संघाची धावसंख्या 3 बाद 96 धावा.
उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या दोन बाद 65 धावा झाल्या आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला पहिल्या सत्रात दोन धक्के बसले. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस हॅरी स्वस्तात माघारी परतले. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांना माघारी धाडलं. मार्नस लाबुशेन 19 धावा आणि स्टीव्ह स्मिथ 30 धावा करुन मैदानात पाय रोवून उभे आहेत.
वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथ झेलबाद. रोहित शर्मानं पकडला झेल. 36 धावा करुन स्मिथ माघारी. ऑस्ट्रेलियाला धक्का, तर भारताची प्रशंसनीय कामगिरी.
44 षटकांच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 3 गडी बाद, 110 धावा. फलंदाजीसाठी खेळपट्टी फायद्याची असूनही वॉशिंग्टन सुंदर फलंदाजांपुढं ठरतोय आव्हान.
16 व्या षटकानंतर ऑस्ट्रेलिया संघाची धावसंख्या 39. ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात माघारी परतावं लागलं. त्यामुळं भारतीय संघाचं मनोधैर्य मात्र वाढलं.
'लंच ब्रेक' पर्यंत 27 षटकांच्या खेळात ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 2 गडी बाद 65 धावा.
बॉर्डर-गावस्कर मालिकेतील अखेरच्या आणि महत्त्वाच्या अशा सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर भारतीय गोलंदाजांनी हे आव्हान पेलत दमदार गोलंदाजीनं संघाला सुरुवात करुन दिली. पहिल्याच षटकात मोहम्मद सिराज यानं संघाला मोठं यश मिळवून दिलं. पहिल्याच षटकात त्यानं डेव्हिड वॉर्नरला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला हादरा दिला.

पार्श्वभूमी

IND Vs AUS 4th Test Live Score Updates भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यावर क्रीडा विश्वाचं लक्ष लागलं आहे. ब्रिस्बेनमधील गाबा मैदानात खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारतीय संघात बरेच बदल केले गेले असून, बरेच नवे चेहरे संघात मोलाचं योगदान देतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान, सध्याच्या घडीला या कसोटी सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी मालिका 1-1 अशा बरोबरीनं पुढे आणली आहे. तर, चार सामन्यांपैकी एक सामना हा अनिर्णित राहिला होता.

परिणामी चौथा सामना हा निर्णायक ठरणार आहे. भारतीय संघात दुखापतग्रस्त खेळाडूंमुळं टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर यांना स्थान देण्यात आलं आहे. तर, ऑस्ट्रेलियाच्या संघातून पुकोवस्कीच्या स्थानी हॅरिसला स्थान देण्यात आलं आहे.

टी नटराजन हा एक असा पहिला खेळाडू आहे, ज्याला एकाच दौऱ्यामध्ये क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये अर्थात एकदिवसीय, टी20 आणि कसोटी मालिकेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या संघानं अॅडिलेड कसोटीमध्ये 8 विकेटनं सामना खिशात टाकला होता. तर, मेलबर्न कसोटीवर भारताचं वर्चस्व पाहायला मिळालं. सिडनी कसोटीमध्ये दोन्ही संघांनी दमदार कामगिरी केली. अखेर या चुरशीच्या लढतीमध्ये सामना अनिर्णित राहिला होता.

बॉर्डर-गावस्कर मालिकेतील अखेरच्या आणि महत्त्वाच्या अशा सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर भारतीय गोलंदाजांनी हे आव्हान पेलत दमदार गोलंदाजीनं संघाला सुरुवात करुन दिली. पहिल्याच षटकात मोहम्मद सिराज यानं संघाला मोठं यश मिळवून दिलं. पहिल्याच षटकात त्यानं डेव्हिड वॉर्नरला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला हादरा दिला.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.