IND vs AUS 4th test : पुजाराचं द्विशतक थोडक्यात हुकलं
एबीपी माझा वेब टीम | 04 Jan 2019 09:18 AM (IST)
त विरुद्ध ऑस्ट्रेलियामधल्या चौथ्या कसोटी सामन्यावर भारताने चांगलीच पकड मिळवली आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस चेतेश्वर पुजाराने गाजवला. परंतु पुजाराला द्विशतकानं हुलकावणी दिली.
सिडनी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामधल्या चौथ्या कसोटी सामन्यावर भारताने चांगलीच पकड मिळवली आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस चेतेश्वर पुजाराने गाजवला. परंतु पुजाराला द्विशतकानं हुलकावणी दिली. पुजाराने 373 चेंडूत 22 चौकारांच्या सहाय्याने 193 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनने पुजाराला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद करत त्याची खेळी संपुष्टात आणली. ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक जेतेपदासाठी सज्ज असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीदेखील भारताच्या फलंदाजांनी सामन्यावर वर्चस्व गाजवले. दरम्यान भारताने आतापर्यंत 6 बाद 458 धावांचा डोंगर उभा केला आहे. ऋषभ पंत (71) आणि रवींद्र जडेजा (13) धावांवर खेळत आहेत.