IND Vs AUS 4th T20 Live Score : टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका जिंकण्यासह जागतिक पराक्रमाची संधी!
India Vs Australia 4th T20 Live Updates : रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर हा पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना असेल. टीम इंडियाने यापूर्वी येथे एक वनडे सामना खेळला होता.
ऑस्ट्रेलियाची गळती सुरुच असून आता आवेश खानने दिला सातवा झटका दिला आहे. ऑस्ट्रेलियाला 15 चेंडूत 42 धावांची गरज आहे.
ऑस्ट्रेलियाला सहावा झटका बसला असून विजयासाठी 21 चेंडूत 49 धावांची गरज आहे. दीपक चहरने शाॅर्टला बाद केले.
ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का; दीपक चहरने मिळवून दिले यश. ऑस्ट्रेलियाला 32 चेंडूत 68 धावांची गरज
फिरकीच्या जाळ्यात ऑस्ट्रेलिया अडकला आहे. अक्सर पटेलने दिला चौथा धक्का. ऑस्ट्रेलियाला 50 चेंडूत 88 धावांची गरज
ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका बसला आहे. अक्सरने हार्डीला क्लीन बोल्ड केले. ऑस्ट्रेलियाच्या 7 बाद 3 बाद 55 धावा
ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका बसला असून खतरनाक दिसणारा ट्रॅव्हिड हेड अक्सर पटेलची शिकार झाला.
ऑस्ट्रेलियाला पहिला झटका बसून फिलीप बाद झाला. दुसऱ्या बाजूने ट्रॅव्हिड हेडची जोरदार फटकेबाजी सुरु आहे.
टीम इंडियाचे ऑस्ट्रेलियासमोर 175 धावांचे आव्हान; शेवटच्या दोन षटकात पाच विकेट गमावल्या
टीम इंडियाला लागोपाठ चार धक्के देत ऑस्ट्रेलियाने मोठ्या धावसंख्येपासून रोखलं आहे.
भारताने 18 षटकांनंतर 5 गडी गमावून 167 धावा केल्या. रिंकू सिंह 28 चेंडूत 46 धावा करून खेळत आहे. जितेशने 19चेंडूत 35 धावा केल्या आहेत.
टीम इंडियाला चौथा धक्का बसला असून ऋतुराज माघारी परतला आहे.
भारताची तिसरी विकेट सूर्यकुमार यादवच्या रूपाने पडली. 2 चेंडूत 1 धावा काढून तो बाद झाला. आता रिंकू सिंह फलंदाजीला आला आहे. ऑस्ट्रेलियाकडून तन्वीर संघा, बेन आणि अॅरॉन हार्डी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. तत्पूर्वी, टीम इंडियाची दुसरी विकेट श्रेयस अय्यरची पडली. तो 8 धावा करून बाद झाला. त्याने 7 चेंडूंचा सामना केला. भारताने 10 षटकात 3 गडी गमावून 78 धावा केल्या आहेत.
टीम इंडियाची पहिली विकेट पडली आहे. यशस्वी 28 चेंडूत 37 धावा करून बाद झाला. त्याने 6 चौकार आणि 1 षटकार मारला. अॅरॉन हार्डीने यशस्वीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताने 6 षटकात एक विकेट गमावत 50 धावा केल्या
रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 सामना सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग-11 मध्ये पाच बदल करण्यात आले आहेत. टीम इंडियाने आपल्या प्लेइंग-11 मध्येही चार बदल केले आहेत.
नाणेफेक जिंकल्यानंतर मॅथ्यू वेड म्हणाला, 'आम्ही पुन्हा गोलंदाजी करू. आमच्या संघात 5 बदल आहेत. स्टॉइनिस, रिचर्डसन, मॅक्सवेल, एलिस आणि इंग्लिस खेळत नाहीत. विश्वचषक खेळणाऱ्या खेळाडूंना विश्रांती देऊन त्यांना मायदेशी पाठवण्याचा चांगला निर्णय घेतल्याचे श्रेय निवडकर्ते आणि कोचिंग स्टाफला द्यायला हवे. यामुळे नवीन खेळाडूंनाही चांगली संधी मिळेल.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): जोश फिलिप, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, अॅरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड (कॅप्टन/विकेटकीपर), बेन ड्वार्शुइस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा
भारत (प्लेइंग इलेव्हन) : यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंह, अक्सर पटेल, रवी बिश्नोई, दीपक चहर, आवेश खान, मुकेश कुमार
IND Vs AUS 4th T20 Live Score : ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकला असून टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार आहे.
पार्श्वभूमी
IND Vs AUS 4th T20 Live Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील चौथा सामना रायपूर येथे होणार आहे. या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने पुढे आहे. आता त्याची नजर मालिकेवर कब्जा करण्यावर असेल. टीम इंडियाला तिसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादव नव्या रणनीतीसह मैदानात उतरणार आहे. रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर हा पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना असेल. टीम इंडियाने यापूर्वी येथे एक वनडे सामना खेळला होता.
भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या T20 सामन्यासाठी संभाव्य खेळाडू
भारत : यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलिया: ट्रॅव्हिस हेड, मॅट शॉर्ट, अॅरॉन हार्डी, बेन मॅकडरमॉट, मॅथ्यू वेड (wk/c), टिम डेव्हिड, ख्रिस ग्रीन, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा.
दुसरीकडे, पाकिस्तानने टी-20 आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक सामने जिंकले आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाने आतापर्यंत एकूण 226 टी-20 सामने खेळले असून त्यापैकी 135 सामने त्यांनी जिंकले आहेत. त्याचबरोबर भारताने सध्याच्या मालिकेतील दुसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून T20 इतिहासातील 135 वा विजय देखील मिळवला. अशाप्रकारे सर्वाधिक टी-20 सामने जिंकण्याच्या बाबतीत भारत आता पाकिस्तानच्या बरोबरीने अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
भारतीय क्रिकेट संघाने 135 टी-20 सामने जिंकण्यासाठी पाकिस्तानपेक्षा खूपच कमी वेळ घेतला आहे. पाकिस्तानने इतके सामने जिंकण्यासाठी 226 टी-20 सामने खेळले होते, तर भारताने केवळ 209 टी-20 सामन्यांमध्ये इतके सामने जिंकले. टीम इंडियाने आजच्या सामन्यात टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तर पाकिस्तानला मागे टाकून तो जगातील सर्वाधिक टी-20 सामने जिंकणारा संघ बनेल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -