मोहाली : आज मोहालीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा एकदिवसीय सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 359 धावांचे आव्हान दिले आहे. आजच्या सामन्यात शिखर धवनने 143 धावांची तुफानी खेळी केली, तर रोहित शर्मानेदेखील 95 धावा करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांमुळे भारताला 358 धावांपर्यंत मज मारता आली. या दोघांच्या तुफानी खेळीनंतरही तिसऱ्याच फलंदाजाचं कौतुक केलं जात आहे. तो फलंदाज म्हणजे जसप्रीत बुमराह.

आजच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी 48.4 षटकांत 352 धावा केल्या होत्या. शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर यजुवेंद्र चहल शुन्यावर बाद झाला. त्यानंतर सामन्याचा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या जसप्रीत बुमराहने एक जोरदार षटकार मारला. त्याचा हा सिक्सर पाहून मोहालीच्या स्टेडियममध्ये एकच जल्लोष सुरु झाला. भारताचा कर्णधार विराट कोहली तर जल्लोष करताना अक्षरशः नाचू लागला.

बुमराहचा तो सिक्सर आणि नाचणाऱ्या विराटने नेटीझन्सना वेड लावलं आहे. विराट आणि बुमराह दोघेही सोशल मीडियावर ट्रेन्डमध्ये आहेत. सर्वांनी विराट आणि बुमराहचे फोटो शेअर केले आहेत. अनेकांनी तर या प्रसंगाला अनुसरुन मिम्सदेखील शेअर केले आहेत.

व्हिडीओ पाहा 


दरम्यान भारताने या सामन्यात शिखर धवनच्या 143 धावा आणि रोहित शर्माच्या 93 धावांच्या खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 358 धावा केल्या आहेत. सलामीवीरांची फटकेबाजी आणि भारताचा रन रेट पाहून भारत भारत 400 धावांपर्यंत मजल मारेल, असे वाटत होते. परंतु धवन-रोहीत वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

मजेशीर मिम्स










बीसीसीआयनेदेखील विराटचा व्हिडीओ शेअर केला आहे