India vs Australia 2nd ODI LIVE : मोठ्या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची अवस्था बिकट, दोन्ही सलामीवीर बाद

IND vs AUS 2nd ODI: 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत पराभव केला. टीम इंडियाची या मालिकेत 0-1 अशी पिछाडी झाली आहे. त्यामुळे आज टीम इंडियासाठी करो या मरोची स्थिती आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Nov 2020 02:22 PM
ऑस्ट्रेलियाची धावसंख्या साडेतीनशे पार, लाबुशेनचं अर्धशतक, ग्लेन मॅक्सवेलचीही धडाकेबाज खेळी
वॉर्नरच्या 83 धावांवर बाद, रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर एक धाव काढत असताना वॉर्नर श्रेयस अय्यरकडून रनआऊट, वॉर्नरने 77 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांसह वॉर्नरच्या 83 धावा काढल्या
मोठ्या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची अवस्था बिकट, दोन्ही सलामीवीर बाद, धवन 30 तर मयांक 28 धावांवर बाद, 9 ओव्हरमध्ये संघाच्या 61 धावा
62 चेंडूत शतक बनवून स्मिथ आऊट, ऑस्ट्रेलियाच्या तीनशे धावा पूर्ण, मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल, सात षटकांचा खेळ बाकी
वॉर्नर, फिंचपाठोपाठ स्टिव्हन स्मिथचंही अर्धशतक,ऑस्ट्रेलियाचा स्कोर 220 पार
वार्नर-फिंचची तुफान फटकेबाजी, सलग दुसऱ्यांदा शतकी भागीदारी, वॉर्नरची शतकाकडे वाटचाल, संघाची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
फिंच 60 धावांवर बाद, मोहम्मद शमीला मिळालं यश, कोहलीनं पकडला झेल, 22.5 षटकांत 142 धावा

वार्नरपाठोपाठ फिंचचंही अर्धशतक, सलग दुसऱ्यांदा शतकी भागीदारी, विकेट घेण्यास भारतीय गोलंदाजांना अपयश, ऑस्ट्रेलियाच्या 21 षटकांत 130 धावा
ऑस्ट्रेलियन सलामीवीर वॉर्नर आणि फिंचची सावध सुरुवात, 8 व्या षटकात ओलांडला 50 धावांचा टप्पा, शमी आणि बुमराह यांची सुरुवातीची षटकं सांभाळून खेळल्यानंतर वॉर्नरचा सैनीवर हल्लाबोल
ऑस्ट्रेलियाची भक्कम सुरुवात, डेव्हिड वॉर्नरचं अर्धशतक, 15 षटकांत 95 धावा, एकही विकेट नाही
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही ऑस्ट्रेलियाची चांगली सुरुवात, 5 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता केल्या 27 धावा, वॉर्नर 19 तर फिंच 9 धावांवर खेळत आहे.
ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय, टीम इंडियात बदल नाही
टीम इंडियाला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी दुसऱ्या सामन्यात विजय मिळवणं बंधनकारक असणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना आज सकाळी 9 वाजेपासून सिडनीत खेळण्यात येणार आहे.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या आज होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात दोन महत्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. पहिल्या वनडेत भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी अक्षरक्षा धुवून काढलं होतं. मागील सामन्यात 10 ओव्हरमध्ये 89 धावा देणाऱ्या युजवेंद्र चहल आणि 10 ओव्हरमध्ये 83 धावा देणाऱ्या नवदीप सैनीला आज संघाबाहेर ठेवलं जाण्याची शक्यता आहे.
आयपीएलमध्ये शानदार प्रदर्शन केलेल्या युजवेंद्र चहलने आपल्या वनडे करिअरमधील सर्वात महागडा स्पेल टाकत 10 ओव्हरमध्ये 89 धावा दिल्या. आजच्या सामन्यात चहलच्या जागी कुलदीप यादवला स्थान मिळण्याची शक्यता आहे. कुलदीपनं मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली कामगिरी केली होती. वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने पहिल्या सामन्यात 10 ओव्हरमध्ये 83 धावा दिल्या. सैनीच्या जागी शार्दुल ठाकूरची वर्णी लागू शकते. सोबतच आयपीएलमध्ये आपल्या यॉर्करमुळं चर्चेत आलेल्या टी नटराजनला डेब्यूची संधी मिळू शकते. टीम इंडियाच्या फलंदाजांच्या फळीत मात्र कुठलाही बदल होण्याची शक्यता नाही.

दुसरीकडे पहिल्या सामन्यात विजयानंतर देखील ऑस्ट्रेलिया संघात बदल होऊ शकतो. गोलंदाजी करताना जखमी झालेल्या ऑलराउंडर मार्क स्टोयनिसच्या जागी कॅमरन ग्रीन आणि मोयसेस हेनरिक्स यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.

3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत पराभव केला. त्यामुळे टीम इंडियाची या मालिकेत 0-1 अशी पिछाडी झाली आहे. त्यामुळे आज टीम इंडियासाठी करो या मरोची स्थिती आहे.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन
आरोन फिंच (कप्तान), डेविड वार्नर, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, एलेक्स कॅरी, पॅट कमिंस, मिशेल स्टार्क, एडम झम्पा और जोश हेझलवुड
पहिल्या सामन्यात पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीनं फील्डर आणि गोलंदाजांना या पराभवासाठी जबाबदार धरत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. सामन्यानंतर कोहली म्हणाला की, आम्हाला तयारीसाठी भरपूर वेळ मिळाला. आम्ही आतापर्यंत जास्त टी-20 खेळत होतो, बऱ्याच काळानंतर आम्ही एकदिवसीय सामना खेळलो, मात्र आम्ही वनडे सामने खूप जास्त खेळलो आहोत.

भारत प्लेइंग इलेव्हन
भारत: शिखर धवन, मयंक अग्रवाल, विराट कोहली (कप्तान), श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी.
सिडनीतल्या पहिल्याच वन डेत यजमान ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाचा 66 धावांनी पराभव केला होता. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 375 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला 50 षटकात आठ बाद 308 धावांचीच मजल मारता आली. भारताकडून हार्दिक पंड्यानं 90 आणि धवननं 74 धावांची खेळी करुन विजयासाठी संघर्ष केला. त्या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी रचली. पण जोश हेझलवूड आणि अॅडम झॅम्पाच्या प्रभावी माऱ्यासमोर त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.
3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत पराभव केला. त्यामुळे टीम इंडियाची या मालिकेत 0-1 अशी पिछाडी झाली आहे. त्यामुळे आज टीम इंडियासाठी करो या मरोची स्थिती आहे.

पार्श्वभूमी

IND vs AUS 2nd ODI: 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत पराभव केला. त्यामुळे टीम इंडियाची या मालिकेत 0-1 अशी पिछाडी झाली आहे. त्यामुळे आज टीम इंडियासाठी करो या मरोची स्थिती आहे. टीम इंडियाला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी दुसऱ्या सामन्यात विजय मिळवणं बंधनकारक असणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना आज सकाळी 9 वाजेपासून सिडनीत खेळण्यात येणार आहे.


 


सिडनीतल्या पहिल्याच वन डेत यजमान ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाचा 66 धावांनी पराभव केला होता. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 375 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला 50 षटकात आठ बाद 308 धावांचीच मजल मारता आली. भारताकडून हार्दिक पंड्यानं 90 आणि धवननं 74 धावांची खेळी करुन विजयासाठी संघर्ष केला. त्या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी रचली. पण जोश हेझलवूड आणि अॅडम झॅम्पाच्या प्रभावी माऱ्यासमोर त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.


 


पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीनं फील्डर आणि गोलंदाजांना या पराभवासाठी जबाबदार धरत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. सामन्यानंतर कोहली म्हणाला की, आम्हाला तयारीसाठी भरपूर वेळ मिळाला. आम्ही आतापर्यंत जास्त टी-20 खेळत होतो, बऱ्याच काळानंतर आम्ही एकदिवसीय सामना खेळलो, मात्र आम्ही वनडे सामने खूप जास्त खेळलो आहोत.


 


विराट म्हणाला की, 20-25 षटकानंतर आमची बॉडी लॅंग्वेज निराशाजनक होती. क्षेत्ररक्षणात चुका होत होत्या. असं असेल तर समोरच्या टीमकडून आपल्याला नुकसान होणारच आहे. समोरच्या फलंदाजांना दबावात आणायचं असेल तर आपल्याला विकेट्स घेणं, चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे, मात्र आम्ही असं करु शकलो नाहीत, असं विराट म्हणाला होता.



भारत प्लेइंग इलेव्हन
भारत: शिखर धवन, मयंक अग्रवाल, विराट कोहली (कप्तान), श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी.


ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन
आरोन फिंच (कप्तान), डेविड वार्नर, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, एलेक्स कॅरी, पॅट कमिंस, मिशेल स्टार्क, एडम झम्पा और जोश हेझलवुड

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.