IND vs AFG 2nd T20 : भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) दरम्यान 3 सामन्यांची टी20 मालिका (T20 Series) खेळवली जात आहे. पहिल्या सामन्यात भारताने दिमाखदार विजय मिळवला होता. मालिकेतील दुसरा सामना आज खेळवण्यात येणार आहे. इंदुरच्या होळकर स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. टीम इंडिया (Team India) मालिकेतील दुसरा विजय मिळवत मालिका खिशात घालण्याचा इराद्याने मैदानात उतरणार आहे.


 किंग कोहली करणार पुनरागमन 


अफगाणिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियात मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विराट कोहली मैदानात उतरणार आहे. कौटुंबिक कारणामुळे तो पहिला सामना खेळू शकलेला नव्हता. टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असेल? याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. कोहली 14 महिन्यांनंतर पुन्हा एकदा टी 20 सामना खेळताना दिसणार आहे.  


कोण जाणार संघाबाहेर?


विराट कोहली संघात परतणार असल्याने तिलक वर्मा टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मधून बाहेर जाण्याची शक्यता आहे. कोहलीच्या अनुपस्थित तिलक वर्मा 3 नंबरवर फलंदाजीसाठी आला होता. कोहली शिवाय यशस्वी जयस्वालही आज संधी मिळू शकते. जयस्वाल जखमी असल्याने पहिला सामना खेळू शकलेला नव्हता. यशस्वी जयस्वालची संघात एंट्री झाली तर शुभमन गिल संघातून बाहेर जाऊ शकतो. 


संभावित भारतीय संघ -


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंह, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, रवि बिश्नोई, मुकेश कुमार


मैदानावर उतरताच रोहितच्या नावावर होणार विक्रम 


आजच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात सर्वांचे लक्ष कर्णधार रोहित शर्मावर असणार आहे. रोहित शर्मा आज मोठ्या विक्रमांना गवसणी घालणार आहे. रोहित टी 20 फॉरमॅटमध्ये 150 सामने खेळणारा पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरणार आहे. रोहितने आत्तापर्यंत 149 सामने खेळले आहेत. रोहितनंतर सर्वाधिका सामने खेळणाऱ्यांच्या यादीत आयर्लंडच्या खेळाडूचा समावेश आहे. पॉल स्टर्लिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 134 सामने खेळले आहेत. त्यानंतर पाकिस्तानच्या शोएब मलिकने 124 तर मार्टिन गुप्टीलने 122 सामने खेळले आहेत. 


वर्ल्डकपपूर्वी शेवटची टी 20 मालिका 


जून 2024 मध्ये खेळवण्यात येणाऱ्या टी 20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघ ही शेवटची टी20 मालिका खेळत आहे. यानंतर विश्वचषकातच टीम इंडिया टी 20 सामना खेळताना दिसणार आहे. दरम्यान त्यापूर्वी आयपीएल 2024 चा हंगाम देखील आहे. विश्वचषकासाठी कोणत्या खेळाडूंना संधी मिळते? याकडे सर्वांचे लक्ष आहे. अक्षर पटेल, जितेश शर्मा यांना टी 20 मध्ये स्वत;ला सिद्ध करावे लागणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


IND vs AFG 2nd T20 : वर्ल्डकपपूर्वी शेवट गोड करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार; रोहित शर्मा सुद्धा महारेकाॅर्ड करणार!