सामन्यातील 44व्या षटकात फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर बेन स्टोक्स बाद झाल. त्याला विकेटकीपर पार्थिव पटेलनं स्टपिंग केलं. बाद झाल्यानंतर माघारी जात असताना स्टोक्सनं जल्लोष करीत असलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंना काहीतरी बोलला. ज्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनंही त्याला प्रत्युत्तर केलं.
मैदानात उपस्थित पंचांकडे विराट कोहलीनं याबाबत तक्रारही केली. अखेर पंचांनी यामध्ये मध्यस्थी करुन वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. भर मैदानाताच या दोघांमधील शाब्दिक बाचाबाची प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
तिसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं आठ गडी गमावून 268 धावांची मजल मारली. टीम इंडियाकडून उमेश, जयंत आणि जाडेजानं प्रत्येकी २ बळी घेतले. तर शमी आणि अश्विननं एक-एक गडी बाद केले.
VIDEO: