U19 Asia Cup 2024 IND vs PAK : आशिया चषक अंडर 19 स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा पराभव केलाय. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 281 धावांचा डोंगर उभार करत भारतासमोर 282 धावांचे आव्हान दिले होते. दरम्यान, पाकिस्तानच्या 282 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला केवळ 237 धावाच करता आल्या आहेत. त्यामुळे भारताला 44 धावांनी पराभव स्वीकारावा लागलाय. भारताकडून निखिल कुमार आणि समर्थ नागराज यांनी चांगली कामगिरी केली. आयुष मात्रे याने देखील चमक दाखवली. मात्र, टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले.
भारताकडून मोहम्मद इनाना आणि युद्धजीतने शेवटच्या टप्प्यात फटकेबाजी केली. मात्र, भारताला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले. इनानने 22 चेंडूमध्ये 2 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 33 धावा केल्या आहेत. युद्धजीतने नाबाद राहत 12 धावा केल्या.
टीम इंडियाकडून आयुष मात्रे आणि वैभव सूर्यवंशी हे सलामीला मैदानात उतरले होते. मात्र, वैभवला केवळ 1 रन काढता आला. तर आयुष 20 धावा करुन बाद झाला. त्याने 14 चेंडू खेळत 5 चौकार लगावले. आंद्रे सिद्धार्थ 15 धावा करत तंबूत परतला. तर कर्णधार मोहम्मद अमानला काही खास कामगरी करता आली नाही. त्याने केवळ 16 धावा केल्या. तर निखिल कुमारने 67 धावांची खेळी केली.
भारताच्या निखिलाची अर्धशतकी खेळी
भारताकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या निखिलने चेंडूंचा सामना करत 67 धावा केल्या. निखिलने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. दरम्यान निखिल शिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला काही खास कामगिरी करता आली नाही. किरण अवघ्या 20 धावा करून तंबूत परतला. हरवंश सिंग 26 धावा करून बाद झाला.
पाकिस्तानकडून शाहजैबची शतकी खेळी
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 50 षटकांत 7 गडी गमावून 281 धावा केल्या. यादरम्यान शाहजेब खान आणि उस्मान खान यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. शाहजैबने शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानला धावांचा डोंगर उभारता आला. त्याने 147 चेंडूंचा सामना करत 159 धावा केल्या. शाहजेबच्या या खेळीत 10 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. उस्माननेही अर्धशतक झळकावत पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारण्यात निर्णायक भूमिका बजावली. त्याने 94 चेंडूंचा सामना करत 60 धावा केल्या. याशिवाय मोहम्मद रियाजुल्ला यानेही 27 धावा केल्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या