मुंबई : हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघाचा टी20 विश्वचषकातील तिसरा साखळी सामना आज आयर्लंडशी होणार आहे. सामन्यात भारतीय महिलांचं पारडं जड मानलं जात आहे. त्यामुळे आयर्लंडविरुद्धच्या सामना जिंकून उपांत्य फेरीत धडक मारण्याचा भारतीय महिलांचा प्रयत्न राहिल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री साडे आठ वाजता सुरु होईल.
ट्वेन्टी ट्वेन्टीच्या दुनियेत भारतीय संघ हा बलाढ्य मानला जात नाही. पण भारतानं विश्वचषकातील गेल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
भारतीय महिलांनी टी20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा 34 धावांनी पराभव करून, टी20 त आपली वाढलेली ताकद दाखवून दिली. या सामन्यात हरमनप्रीतनं अवघ्या 51 चेंडूंत 103 धावांची, तर जेमिमा रॉड्रिग्सनं 45 चेंडूंत 59 धावांची खेळी उभारली.
विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तानच्या महिला संघाचा 7 विकेट्सने पराभव करत आपली विजयी घौडदौड कायम ठेवली. या सामन्यात भारतीय महिला संघाने 7 विकेट्स आणि 6 चेंडू राखत विजय मिळवला. मिताली राजने शानदार 7 चौकारांच्या मदतीने 56 धावा ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केले.
9 नोव्हेंबरपासून महिला टी20 विश्वचषक, पाहा संपूर्ण वेळापत्रक
भारतीय महिलांचा टी 20 विश्वचषकातील प्रवास...
सलामीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 34 धावांनी पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर 7 विकेट्सने विजय मिळवला. आज भारताचा सामना आयर्लंडशी होईल.
टी20 विश्वचषकाच्या आजवरच्या इतिहासात भारतीय महिला संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आलेलं नाही. गेल्या पाच विश्वचषकांत तीन वेळा ऑस्ट्रेलियाने तर इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी एकदा बाजी मारली आहे. त्यामुळे हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय महिला संघ नवा इतिहास घडवणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरेल.
महिला ट्वेन्टी 20 विश्वचषक : वेध उपांत्य फेरीचे
सिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
15 Nov 2018 10:12 AM (IST)
ट्वेन्टी ट्वेन्टीच्या दुनियेत भारतीय संघ हा बलाढ्य मानला जात नाही. पण भारतानं विश्वचषकातील गेल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -