ICC ODI Rankings: इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) एकदिवसीय क्रिकेट फलंदाजांची क्रमवारी (ICC Ranking) जाहीर केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहलीचं प्रथम स्थान त्याला गमावावं लागलं आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरी केल्यानंतर पाकिस्तानच्या बाबर आझमनं नंबर एकचं स्थान प्राप्त केलं आहे. 26 वर्षीय बाबर आझम 865 गुणांसह ताज्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आला आहे.
कोहली मागील 1,258 दिवसांपासून फलंदाजीच्या क्रमवारीत टॉपवर होता. त्याचं स्थान आता बाबरनं पटकावलं आहे. बाबर झहीर अब्बास (1983-84), जावेद मियांदाद (1988-89) आणि मोहम्मद यूसुफ (2003) नंतर आयसीसी क्रमवारीत पहिलं स्थान पटकावणारा चौथा खेळाडू ठरला आहे. आता कोहली 857 गुणांसह दुसऱ्या नंबरवर आहे.
बर्याच दिवसांपासून दुसर्या क्रमांकावर असलेला भारताचा सलामीवीर रोहित शर्मा ताज्या क्रमवारीत तिसर्या क्रमांकावर घसरला आहे. त्याचे 825 अंक आहेत. न्यूझीलंडचा रॉस टेलर 801 गुणांसह चौथ्या तर ऑस्ट्रेलियाचा अॅरोन फिंच 791 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज फखर जमानने 193 धावांची खेळी केली. या खेळीमुळे आयसीसीच्या नव्या क्रमवारीत त्याला चांगलाच फायदा झाला आहे. आता तो सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
ICC टॉप पाच फलंदाज
बाबर आझम- पाकिस्तान
विराट कोहली- भारत
रोहित शर्मा- भारत
रॉस टेलर- न्यूझीलंड
अॅरॉन फिन्च- ऑस्ट्रेलिया
ICC टॉप पाच गोलंदाज
ट्रेन्ट बोल्ट - न्यूझीलंड
मुजीब उर रहमान- बांगलादेश
मॅट हेन्री- न्यूझीलंड
जसप्रीत बुमराह- भारत
मेहेदी हसन- दक्षिण आफ्रिका