Suryakumar Yadav : इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडणार हे निश्चित मानले जात आहे. सूर्यकुमार यादव यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. या शस्त्रक्रियेमुळे सूर्यकुमार जवळपास तीन महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहू शकतो. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएल सुरू होणार असल्याने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवला खेळणे कठीण आहे.






हर्नियाशिवाय सूर्यकुमार यादवलाही घोट्याच्या दुखापतीने ग्रासले आहे. विश्वचषकानंतर सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत भाग घेतला. सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतही उत्कृष्ट फॉर्म दाखवला आणि या मालिकेतील शेवटच्या सामन्यात तो जखमी झाला. घोट्याच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या सूर्यकुमार यादवचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.






इनसाइड स्पोर्ट्सच्या अहवालानुसार, शस्त्रक्रियेनंतर सूर्यकुमार यादवला मैदानात परतण्यासाठी 8 ते 9 आठवडे लागतील. सूत्राच्या हवाल्याने असा दावा करण्यात आला की, “सूर्यकुमार यादवच्या केसला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत आहे. हर्नियाच्या ऑपरेशननंतर, मैदानात परतण्यासाठी 8 ते 9 आठवडे लागतात. आयपीएलपर्यंत तो बरा होईल, अशी आम्हाला आशा आहे.


वर्ल्डकपमध्ये निराशा


सूर्यकुमार यादवसाठी 2023 हे वर्ष चांगले राहिले नाही. सूर्यकुमार यादवला वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळाली. पण सूर्यकुमार यादवच्या कामगिरीत वनडेत सुधारणा झाली नाही. संजू सॅमसनऐवजी सूर्यकुमार यादवचा विश्वचषक संघात समावेश करण्याच्या निर्णयावर बरीच टीका झाली होती. मात्र, आता सूर्यकुमार यादवला वनडे फॉरमॅटमध्ये पुन्हा संधी मिळणे फार कठीण असल्याचे मानले जात आहे.


सूर्यकुमार हा टी-20 मध्ये संघाचा महत्त्वाचा भाग आहे. सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली कामगिरी केली. सूर्यकुमार यादव यंदा होणाऱ्या टी-20 विश्वचषकात खेळणार हे निश्चित मानले जात आहे.


इतर महत्वाच्या बातम्या