ODI Ranking : विश्वचषक 2023 मध्ये सुरू असलेल्या घमासानमध्ये ICC ने खेळाडूंची अपडेटेड एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. अव्वल फलंदाजांच्या क्रमवारीत कमालीची उसळण झाली आहे. अशा स्थितीत प्रथम क्रमांकासाठी स्पर्धा अधिक रंजक बनली आहे. याचाच अर्थ वर्ल्डकपमध्ये चाचपडत असलेल्या पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची वनडे क्रमवारीतील प्रथम क्रमाकाची राजवट संपुष्टात येताना दिसत आहे.






बाबर आझमची बॅट 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत शांतच आहे. त्याचप्रमाणे नंबर दोनवर असलेल्या शुभमन गिलची बॅटही अजूनही शांतच आहे. मात्र, या दोघांमध्ये केवळ सहा गुणांचे अंतर आहे. त्यामुळे आगामी सामन्यात त्याने चांगली खेळी केल्यास बाबर आझमची बादशाहत संपुष्टात येऊ शकते. दुसरीकडे, या दोघांनंतर पुढील सहा फलंदाज आहेत जे या विश्वचषकात वेगाने धावा करत आहेत. त्यामुळे ताज्या ICC एकदिवसीय क्रमवारीत नंबर-1 स्थानासाठी आता आठ दावेदार आहेत.






डी कॉक आणि क्लासेनही शर्यतीत


बाबर आझम आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत 829 रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. शुभमन गिल (823) बाबरपेक्षा फक्त 6 गुणांनी मागे आहे. या दोघांसमोर दक्षिण आफ्रिकेच्या जोडीचे कडवे आव्हान आहे. या विश्वचषकात तीन शतके झळकावल्यानंतर क्विंटन डी कॉक 769 रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी हेनरिक क्लासेन (756) मोठ्या खेळीमुळे चौथ्या स्थानावर आला आहे.






विराट कोहली पुन्हा नंबर 1 होण्याच्या मार्गावर 


एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांच्या या क्रमवारीत डेव्हिड वॉर्नर आणि विराट कोहली यांच्यात पाचव्या क्रमांकाची बरोबरी आहे. दोन्ही फलंदाजांच्या खात्यात 747 रेटिंग गुण आहेत. एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही फलंदाज चांगल्या धावा करत आहेत. त्यामुळेच त्यांच्या मानांकन गुणांमध्ये वाढ झाली आहे. येथे आयरिश फलंदाज हॅरी टेक्टर (729) सातव्या स्थानावर कायम आहे. त्याचबरोबर विश्वचषकात स्फोटक खेळी खेळणारा रोहित शर्मा (725) आठव्या क्रमांकावर आहे. एकूणच, क्रमांक-1 ते क्रमांक-8 पर्यंत फलंदाजांच्या रेटिंग गुणांमध्ये फारसा फरक नाही.


इतर महत्वाच्या बातम्या