World Cup 2023 Semi Final Chances For Pakistan: पाकिस्तानने 2023 विश्वचषक स्पर्धेत डकवर्थ लुईस नियमानुसार न्यूझीलंडचा 21 धावांनी पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानला उपांत्य फेरीची आशा अजूनही जिवंत आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानसाठी हा करो वा मरो सामना होता, ज्यामध्ये पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमान 155.56 च्या स्ट्राइक रेटने नाबाद 126 धावा करून हिरो ठरला. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका सेमीफायनलसाठी पात्र झाले आहेत, पण तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी चुरस कायम आहे. इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलिया जिंकल्यास त्यांचा तिसऱ्या स्थानाचा दावा आणखी मजबूत होईल. पाकिस्तानसाठी समीकरणे जुळून आल्यास भारताविरुद्ध सेमीफायनलला धडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. 






पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याची संभाव्य समीकरणे कोणती?


फखरने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 11 लांब षटकार मारले. यादरम्यान कर्णधार बाबर आझमने त्याला साथ देत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 66 धावा केल्या आणि आपल्या संघाला उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राखले. या विजयानंतर, पाकिस्तान 8 गुणांसह आणि +0.036 च्या निव्वळ धावगतीने गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याची संभाव्य समीकरणे कोणती आहेत ते इथून जाणून घेऊया.







  1. सर्व प्रथम, पाकिस्तानला इंग्लंडविरुद्धच्या पुढील सामन्यात पराभव करावा लागेल. त्यानंतर बाबर सेनेचे 10 गुण असतील.

  2. गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडला शेवटच्या सामन्यात पराभव पत्करावा लागेल आणि सहाव्या क्रमांकावरील अफगाणिस्तानला पुढील दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागेल, त्यानंतर पाकिस्तानचे उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित होईल.
    जर पाकिस्तान इंग्लंडविरुद्धचा पुढचा सामना हरला, तर न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानच्या संघांनी पुढील सर्व सामने अशा खराब नेट रनरेटने गमावले पाहिजेत की त्यांचा नेट रन रेट पाकिस्तानपेक्षा कमी होईल. कारण सध्या न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे समान 8-8 गुण आहेत.

  3. अफगाणिस्तानला एक सामना गमवावाच लागेल. जर अफगाण संघाने दोन्ही सामने जिंकले तर तो गुणांमध्ये पाकिस्तानच्या पुढे असेल, कारण पाकिस्तानने 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि अफगाणिस्तानने 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत.

  4. पुढचा सामना पाकिस्तानने जिंकला पाहिजे. जर न्यूझीलंडने त्यांचा पुढचा सामना जिंकल्यास अटीतटीचा झाला पाहिजे. ज्यामुळे पाकिस्तानचा निव्वळ धावगती न्यूझीलंडपेक्षा चांगली असेल. कारण पाकिस्तान आणि न्यूझीलंडने 8 पैकी 4-4 सामने जिंकले आहेत आणि सध्या किवी संघाचा नेट रन रेट पाकिस्तानपेक्षा चांगला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या